पाऊले चालती पंढरीची वाट...

    दिनांक : 21-Jun-2022
Total Views |

वेध


संत, महंत, वारकरी Pandhari vari संप्रदायाचा फार मोठा वसा महाराष्ट्राला लाभलेला आहे. सामाजिक-सांस्कृतिक-आध्यात्मिक परंपरेच्या या देशात विविध जाती, धर्म, पंथाच्या पालखी एकत्रीकरणाने येतात.

 
 
 
pandhari

 

 
 
प्रत्येक कानाकोपर्‍यात समाजाला सुसंस्कारित करण्यासाठी शिक्षण, आचरण, विचारातून प्रबोधनाचे कार्य पुरातन काळापासून भजन-कीर्तन-पारायणामार्फत वारकरी वर्षभर करीत असतात. पायी केल्या जाणार्‍या पंढरीच्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे. बाराव्या-तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो.
 

संत ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका Pandhari vari खांद्यावर घेऊन सर्व जातीपातींच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले. हेच व्यापक स्वरूप जपत पुढे संत एकनाथ महाराज, जगतगुरू तुकाराम महाराज, मल्लप्पा वासकर यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली. संत तुकाराम महाराज यांच्याही कुटुंबात वारीची परंपरा होती. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आळंदी येथून वारी महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे स्थिरावते. सामुदायिक संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूरकडे मार्गस्थ होते. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होत.

 

वारकरी Pandhari vari संप्रदायात लहान-मोठा भेद नाही. नामजपानेच पुण्य मिळते हा भाव आहे. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात. वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते. आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिला-पुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे, असे मानले जाते. त्यांना आषाढी एकादशी संतश्रेष्ठ विठुरायांच्या दर्शनाची आतुरतेने वाट पाहणार्‍या बळीराजा शेतकरी पंढरपूरच्या दिशेने हजारो किलोमीटर पायी प्रवास करतात. संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर), संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम, संत नामदेव, संत निवृत्तीनाथ, संत बहिणाबाई, संत गजानन महाराज यांच्या पालखीत हजारो महिला-पुरुष अत्यंत शिस्तबद्ध नियोजनपूर्वक टाळ मृदंग, हत्ती, घोडे, गणवेषधारी Pandhari vari वारकरी म्हणून स्वयंस्फूर्तीने सहभागी होतात. रस्त्यात अनेक ठिकाणी सेवाभावी संस्था, मंडळ, मंदिरात फराळ, भोजन-निवास व्यवस्था करीत गावकरी उत्साहाने स्वागत करतात.

 

वारीच्या दरम्यान होणारे रिंगण हे वारीचे वैशिष्ट्य मानले जाते. खुडूस फाटा, वेळापूर आणि Pandhari vari वाखरी येथे रिंगण होते. रिंगण ही एक पवित्र आणि श्रद्धेय संकल्पना आहे. मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात. यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो. याला आदराने 'माउलीचा अश्व' असे म्हणतात. या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात, अशी वारकरी संप्रदायात धारणा आहे. देहू येथून जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या 337 व्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी देवस्थानने केली आहे.

 

आज 20 जून रोजी पहाटे मंदिरात विविध कार्यक्रमाची सुरुवात झाली. शिळा मंदिर इथे अभिषेक झाला. त्यानंतर पालखी पंढरीच्या दिशेने रवाना झाली आहे. पालखीचा संगम निसर्गरम्य अविस्मरणीय दिवेघाट येथे होतो. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा जाणार्‍या मार्गाची राष्ट्रीय महामार्ग म्हणून यापूर्वीच घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये चार पदरी महामार्ग आणि त्याला लागूनच पायी चालणार्‍या Pandhari vari वारकर्‍यांच्या सोयीसाठी साडेतीन ते साडेपाच मीटरचा स्वतंत्र रस्ता करण्यात येणार आहे. त्याद्वारे पादचारी रस्त्याचे वेगळे अस्तित्व निर्माण केले जाणार आहे. दोन्ही पालख्यांचा विसाव्याची ठिकाणेही विकसित केली जाणार आहेत. हा रस्ता करताना शक्य तिथे झाडे वाचविण्याचे आदेश दिले आहेत. हा नवीन पालखी मार्ग पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होण्यासाठी वारकरी आतुरतेने वाट पाहत आहेत.

 
 
- नितीन शिरसाट
 

- 9881717828