"शाब्बास एकनाथजी, योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाहीतर...": नारायण राणेंचं खळबळजनक ट्विट

    दिनांक : 21-Jun-2022
Total Views |
मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे सध्या चर्चेचा विषय बनलेले असून सध्या ते कुणाच्याही संपर्कात नसल्याने सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे शिंदे हे भाजपात जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्शवभूमीवर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी त्याच्या विशेष शब्दशैलीत शिंदेंना उद्देशून एक सूचक ट्विट केलं आहे. “शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता”, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

3 man
 
 
ठाकरे सरकारने शिवसेनेच्या गटनेतेपदावरून एकनाथ शिंदेची उचलबांगडी केल्याने नेमकी पुढे ते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. शिंदे भाजपात जाणार की नाही ? मिलिंद नार्वेकर शिंदेची समजूत काढण्यात कितपत यशस्वी होणार हे आता वेळच ठरवेल. तरी मात्र राजकीय वर्तुळात याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात असून सध्या राजकीय हालचालींना वेग आलेला असून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.