नैसर्गिक वीज भयावह संकट!

    दिनांक : 20-Jun-2022
Total Views |


वेध


आज कृत्रिम पद्धतीने Power Crisis निर्माण केलेली वीज औद्योगिक प्रगतीचे साधन बनली आहे. मात्र त्याचवेळी नैसर्गिक वीज भयावह संकट ठरत आहे.

 
 
 
vij
 

 

 
विजेशिवाय आधुनिक प्रगती शक्य नाही. अशा स्थितीत नैसर्गिक रीत्या कोसळणारी वीज पृथ्वीतलावरील मनुष्य आणि प्राण्यांसाठी कर्दनकाळ ठरली आहे. शनिवार, 18 जून रोजी नरखेड तालुक्यातील जलालखेडा भागात वीज कोसळली आणि तीन शेतकर्‍यांचा तसेच दोन बैलांचा हकनाक बळी गेला. परिणामी हा भयावह प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेतात तर काम करायचेच आहे. तिकडे मे आणि जून या महिन्यात वातावरणातील बदलांमुळे वीज पडणारच आहे. ती नैसर्गिक प्रक्रिया असल्याने आपण तिला रोखू शकत नाही. मात्र यापासून स्वत:चा अन् प्राण्यांचा सहजतेने बचाव नक्कीच करू शकतो. हाच बचाव नेमका कसा करायचा याची शास्त्रोक्त माहिती शेतकर्‍यांनी करून घ्यायला हवी. Power Crisis वीज म्हणजे ढगांमध्ये चालू असलेल्या वादळासमवेत उत्सर्जित होणारी मोठी प्रकाशमान विद्युत शक्ती होय.
 

क्षणिक उच्च Power Crisis विद्युत प्रवाहयुक्त व कित्येक किलोमीटर मार्ग असलेले विद्युत विसर्जन अशी विजेची व्याख्या करता येईल. वीज म्हणजे पृथ्वीच्या वातावरणात असणारा प्रचंड भाराचा विद्युत प्रवाह होय. उच्चदाबाची नैसर्गिक वीज ज्या वेळी उत्सर्जित होते, तेव्हा ती जवळ जवळ 10 कोटी वॅट प्रवाहित होते. त्यावेळी तिचे सर्वोच्च तापमान 30,000 डिग्री सेल्सिअस किंवा त्याहीपेक्षा जास्त असू शकते. या प्रचंड उष्णतेमुळे विद्युत मार्गात सापडणार्‍या धातूंच्या पदार्थांची चक्क वाफ होऊन जाते. विद्युत मार्गातील ही उष्णता एकाएकी वाढत असल्यामुळे मार्गातील हवेचा दाबही स्फोटक तीव'तेने वाढतो. त्यानंतर विद्युत गर्जना निर्माण होते. यालाच आपण विजांचा कडकडाट म्हणतो. असाच कडकडाट झाला अन् जलालखेडा भागातील तीन शेतकरी गतप्राण झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत शेकडो शेतकर्‍यांचा असाच Power Crisis वीज पडून मृत्यू झाला आहे. या घटना आपण सहजतेने टाळू शकतो. त्याकरिता काही सोपे उपाय आता अंमलात आणण्याची गरज आहे. त्यात शेतमजुरांनी गटागटाने शेतात न राहता दूर दूर राहायला हवे.

 

शेतकरी, शेतमजूर वारा-वादळाची चिन्हे दिसली तरीही त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्या परिस्थितीत काम करतात. त्यामुळे आयत्या वेळी वादळात योग्य तो आसरा न मिळाल्याने ते जिवास मुकतात किंवा जखमी होतात. जनावरांना झाडाखाली बांधल्याने झाडावर वीज Power Crisis पडून जनावरेही दगावतात.

 

म्हणूनच जेव्हा केव्हा आकाशात ढगांचा गडगडाट चालू असतो तेव्हा सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. शेतात काम करत असलेल्यांनी तत्काळ गोठा अथवा शेतघरात जाऊन स्वत:ला सुरक्षित करावे. झाडाखाली थांबू नये. जनावरे झाडाखाली बांधू नये. त्यांना गोठ्यातच बांधावे. झाडापासून त्याच्या उंचीच्या दुप्पट अंतरावर उभे राहावे. जवळ कुठलीही धातूची वस्तू बाळगू नये. मोबाईल असेल तर तो पूर्णपणे बंद करून ठेवावा. मोकळ्या मैदानात असल्यास खाली बसून दोन्ही गुडघ्यात मान घालून दोन्ही हात कानावर धरावेत.

 

विजेच्या Power Crisis झटक्याने मनुष्यास मृत्यू येणे शक्य आहे. परंतु सौम्य स्वरूपाचा आघात झालेल्या व्यक्तीस कृत्रिम श्वासोच्छवासादी प्रथमोपचारांनी सावध करता येते. विजेचा झटका लागलेल्या व्यक्तीस स्पर्श करणे धोक्याचे असते, हाही समज चुकीचा आहे. झटक्यामुळे मनुष्य भाजला जातो किंवा तो बेशुद्ध पडतो. पण त्याच्या अंगात विद्युत संचय होत नाही. म्हणून अशा पीडितास प्रथमोपचार (सीपीआर) देण्यासाठी प्रयत्न करावाच. विशेषत: शेतकर्‍यांनी शेतात काम करीत असताना काळजी घ्यावी. पावसात भिजल्यास नुकसान नाही, मात्र ओले होऊ नये म्हणून झाडाखाली जाणे 'आ बैल मुझे मार' ठरू शकते. यावेळी मैदानात खाली बसणे हितकारक ठरू शकते. शिवाय दामिनी नावाचे अ‍ॅप वापरूनही शेतकरी स्वत:चा बचाव करू शकतात. शेवटी जीवनाचे महत्त्व तोच जाणतो, जो काम करताना सुरक्षा पाळतो. हीच सुरक्षा शेतकर्‍यांनी पाळली तर नक्कीच आपण कटू घटना टाळू शकतो. Power Crisis मानवी जीवन अमूल्य आहे. ते असे व्यर्थ जायला नको, याचाच सर्वांनी विचार करावा, हीच अपेक्षा.

 

- अनिल फेकरीकर

 
 - 9881717859