४२४ सेलिब्रिटींना पुन्हा सुरक्षा द्या - पंजाब हायकोर्ट

    दिनांक : 02-Jun-2022
Total Views |
पंजाब : गायक सिद्धू मुसेवाला यांची सुरक्षा काढल्यावर दुसऱ्याच दिवशी मुसेवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यानंतर पंजाबमधील हालचालींना वेग आलेला आहे. व्हीव्हीआयपी सुरक्षा काढून घेतल्याबद्दल उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने आप सरकारला 424 सेलिब्रिटिंना पुन्हा सुरक्षा बहाल करण्याचे आदेश दिले आहेत.
 
 
 punjab
 
 
पंजाबमध्ये 424 जणांची सुरक्षा कमी करण्यात आली होती. सिद्धू मुसेवाला हे देखील त्यापैकीच एक होते. व्हीव्हीआयपी सुरक्षा काढल्याबद्दल पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली. या सुरक्षेच्या प्रकरणाबाबत सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणेतर्फे करण्याची मागणी केली आहे. याबाबत मुसेवाला यांच्या कुटुंबियांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे