देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींचा आज वाढदिवस

    दिनांक : 18-Jun-2022
Total Views |
मोदींनी आज सकाळीच आईचे पाय धुवून घेतले दर्शन
 
अहमदाबाद - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मातोश्री हिराबेन मोदी (Heeraben 100th Birthday) यांचा आज १८ जून रोजी १०० वा वाढदिवस साजरा होत आहे.
 
 
 

modiji
 
 
 
 
त्याच पार्श्वभूमीवर गुजरात दौऱ्यावर असलेल्या नरेंद्र मोदींनी आज सकाळीच गांधीनगर येथील घरी आईचे पाय धुवून दर्शन घेतले. तसेच, मातोश्रींसमवेत घरातील देवांची पूजा-आरतीही केली. सोशल मीडिया अकाऊंटवरुन याचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.
 
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदींनी त्यांच्या मातोश्रींच्या निरोगी आयुष्यासाठी वडनगर येथे काही धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. दुसरीकडे गांधीनगर येथे एका नव्या रस्त्याला त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्रींचं नाव दिलं जाणार आहे. हिराबेन मोदी सध्या नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांच्यासोबत गांधीनगर येथे राहतात. मोदींचे धाकटे बंधू पंकज मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार हिराबेन मोदी यांचा जन्म १८ जून १९२३ साली झाला होता. यंदा १८ जून २०२२ मध्ये त्या आपल्या १०० व्या वर्षात पाऊल टाकत आहेत. पंतप्रधान देखील आज गुजरातमध्ये आहेत आणि ते मातोश्रींच्या वाढदिवशी पावागढ मंदिराला भेट देतील.
 
आपल्या बालपणी आपली आई दुसऱ्याच्या घरी धुनी-भांडी करायची आणि इतक्या कष्टातून आईने मला मोठं केलं असं सांगताना मोदी भारावून गेले. नरेंद्र मोदी या वेबसाईटवर आपल्या ब्लॉगमध्ये पंतप्रधानांनी आपल्या आईविषयी अनेक आठवणी सांगितल्या आहेत.आपल्या ब्लॉगमध्ये पंतप्रधान मोदींनी आपल्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करत अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. मोदी म्हणतात की, "आई हा एक शब्द नाही. स्नेह, धैर्य, विश्वास अशा सगळ्या भावनांचं प्रतीक म्हणजे आई. आज मी आनंदाची बातमी तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छितो. माझी आई, हीराबा आज 18 जून रोजी शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहे".आज माझ्या आयुष्यात जे काही चांगलं आहे, माझ्या व्यक्तिमत्वात जे काही चांगलं आहे ते आईवडिलांचं आहे. आज मी दिल्लीत बसून हे लिहित असताना अनेक आठवणी दाटल्या आहेत".
 
मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यात ते अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत आणि २१ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक अनेक उपक्रमांचं उदघाटनही ते करणार आहेत.
 
हिराबेन यांच्या नावानं गांधीनगरमध्ये रस्ता
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांच्या नावानं गांधीनगरमध्ये एका रस्त्याचं लोकार्पण देखील होणार आहे. गांधीनगर येथे रायसणला जोडणाऱ्या रस्त्याला हिराबेन मोदी यांचं नाव दिलं जाणार आहे.