बेशिस्त पार्किंगवर रामबाण उपाय

    दिनांक : 18-Jun-2022
Total Views |


वेध


यापूर्वी महाराष्ट्रात देवीचा रोग मोठ्या प्रमाणात पसरला होता. त्यापासून प्रतिबंध करण्यासाठी राज्यात देवीची लस मोठ्या प्रमाणात देण्याचे अभियान शासनाने राबविले होते.

 
 
 
 
parking

 

 
 
त्यानंतर या रोगावर नियंत्रण मिळून हा रोग हद्दपार झाला. अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर हे यश आरोग्य यंत्रणेला मिळाले होते. त्यानंतर रोगाचा प्रसार संपूर्णत: राखण्यात यश आल्याची खात्री झाल्यावर शासनाने 'देवीचा रोगी कळवा आणि शंभर रुपये मिळवा' अशी जाहिरात चालविली होती. अनेक वर्ष ती सुरू होती. तसाच काहीसा प्रकार आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राबविण्याचे ठरविले असल्याचे दिसले. 'बेशिस्त वाहनांचा फोटो पाठवा आणि 500 रुपये मिळवा' असे अभियान त्यांनी राबविण्याचे ठरविले आहे. Parking बेशिस्त पार्किंगवर नियंत्रण मिळविण्यासाठी तसा कायदाच करण्याचे त्यांनी ठरविले असल्याचे गुरुवारी त्यांनी घोषित केले. दिल्लीतील इंडस्ट्रीयल डिकार्बनायझेशन समिटमध्ये त्यांनी याबाबतची घोषणा केली.
 

रहदारीला अडथळा होतो म्हणून देशातील लहान-मोठ्या शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्ते अधिक रुंद व प्रशस्त केले जातात. मात्र, त्या रस्त्यांवर बाजारात येणार्‍या नागरिकांची वाहने अस्ताव्यस्त उभी केली जातात. परिणामी नव्याने रुंदीकरण केले; रस्तेही चिंचोळेच होतात. रहदारीची समस्या जैसे थे राहते. याचे कारण म्हणजे नागरिकांमध्ये अजूनही Parking पार्किंगबाबत जागरुकता नसल्याचे दुर्दैवाने म्हणावे लागते. यावर उपाय म्हणून व नागरिकांमध्ये पार्किंगबाबत जाणीव जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बेशिस्त वाहनाचे छायाचित्र नागरिकांनी काढून पाठवावे. त्या वाहनधारकाला 1 हजार रु. दंड करण्यात येईल. त्यातून 500 रु. छायाचित्र पाठविणार्‍या बक्षीस म्हणून देण्यात येतील, अशी ही योजना असणार आहे. नव्हे, याबाबत तसा कायदाच करण्याचा विचार मंत्रिमहोदयांनी केला आहे. आपल्या देशात अनेकांना कार Parking पार्किंगबाबत शिस्त नसल्याचे दिसून येते. मिळेल त्या ठिकाणी गाडी उभी करण्याकडे वाहनधारकांचा कल असतो. त्यामुळे रहदारीचा प्रश्न निर्माण होतो. वास्तविक बाजारात अथवा सोसायटीमध्ये वाहनतळाची व्यवस्था असली पाहिजे. नवीन व्यापारी संकुल अथवा निवासी संकुल बांधकामाची परवानगी देतानाच संबंधित विभाग अथवा महानगर पालिका, नगर पालिका प्रशासनाने वाहनतळाची व्यवस्था करणे त्या संकुल मालक अथवा विकासकाला बंधनकारक केले पाहिजे.

 

मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर वाहने उभी करू नये, असा नियम आहे. अनेक ठिकाणी नो Parking पार्किंगचे फलक लागलेले असतात. पण, वाहनधारक आपली वाहने रस्त्यावर, नो Parking पार्किंग झोनमध्येच उभी करून खरेदीसाठी जातात. मग, एखाद्या कोपर्‍यात उभे असलेले वाहतूक पोलिस वाहनाजवळ येऊन त्या वाहनाला जामर लावतात किंवा वाहन उचलून घेऊन जातात. नंतर वाहनधारकाला दंड आकारला जातो. अशाप्रकारे दंड आकारण्यापूर्वीच वाहन उभे करतानाच त्या वाहनधारकाला तेथे वाहन उभे करण्यास मज्जाव केला, तर पुढील समस्याच निर्माण होणार नाहीत. मात्र, वाहतूक नियंत्रण पोलिस शिकार करण्यासाठी टपून बसतात. महानगरांमध्ये वाहने उभी करण्यासाठी विशिष्ट जागा मनपा अथवा नगर पालिकेने उपलब्ध करून दिलेली असते. रस्त्याच्या कडेला आडवे व तिरपे पांढरे पट्टे आखलेले असतात. त्या पट्ट्याच्या आत आणि दोन तिरप्या पट्ट्यांच्या मध्ये वाहन उभे करणे अपेक्षित असते; पण त्याकडे कोणीच लक्ष देत नाही. ज्या दुकानात जायचे त्या दुकानासमोर रस्त्यावरच वाहन Parking बेशिस्तपणे उभे करून खरेदीसाठी जाणे नागरिक पसंत करतात. हे चुकीचे आहे, असे त्यांना माहीत असले तरीही ते तसेच वागतात. नितीनजींनी वरीलप्रमाणे बक्षीस देण्याची घोषणा केली असली, तरी त्यामागचा उद्देश वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड बसवा, असा मुळीच नाही. निदान त्यामुळे तरी वाहनधारक आपली वाहने शिस्तीत आणि वाहनतळांवर उभी करतील, अशी अपेक्षा त्यांना आहे. तेव्हा, नागरिक आणि वाहनधारकांनी याचा विचार करून वाहने शिस्तीत उभी करण्याचा निश्चय केला पाहिजे. आपल्या शहरातील वाहतुकीला शिस्त लावणे हे आपल्याच हाती आहे. याचा नागरिक नक्कीच विचार करील, ही अपेक्षा!

 
- विजय कुळकर्णी
 

- 8806006149