क्रिकेट खेळतांना मैदानावरच आला हृदयविकाराचा झटका, ज्येष्ठ खेळाडूचा मृत्यू!

    दिनांक : 13-Jun-2022
Total Views |
नाशिक: नाशिकमध्ये (Nashik) क्रिकेट खेळतांना फलंदाजीसाठी उतरलेल्या एका ज्येष्ठ खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरात क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सर्व जेष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता. यावेळी फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या एका ज्येष्ठ खेळाडूचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सुरेश करवा असे या जेष्ठ खेळाडूचे नाव आहे. त्यामुळे आयोजित क्रीडा स्पर्धा काही काळ स्थगित करण्यात आल्या. त्यानंतर करवा यांच्या स्मरणार्थ पारितोषिके देण्याचे एकमताने ठरविण्यात आले. त्यानंतर क्रीडा स्पर्धा सुरु झाली.
 
 
 

cricket1
 
 
 
इंदिरानगर येथे खेळों इंडियाच्या पार्श्वभूमीवर श्री प्रतिष्ठान व काळी धर्मराज बडोदे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर सामन्यांना सुरवात झाली. यावेळी लाइफ मिशन नागरिक संघात खेळाडू कमी असल्याने सुरेश करवा कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघाविरुद्ध पहिला सामना खेळले. त्यावेळी सुधाकर चव्हाण यांच्याबरोबर चांगली फलंदाजी केली.
 
दरम्यान दुपारनंतर करवा सहभागी असलेल्या जीवन प्रवास ज्येष्ठ नागरिक संघ व स्टेट बँक निवृत्त कर्मचारी संघ यांच्यात क्रिकेटचा सामना होता. यावेळी मैदान फलंदाजीसाठी उभे असलेले अचानक कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. तीव्र हृदयविकाराच्या धक्क्यामुळे त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अचानक झालेल्या घटनेने जेष्ठ नागरिक व प्रेक्षक स्तब्ध झाले. क्रीडा महोत्सवाचे आयोजक माजी नगरसेवक ऍड. शाम बडोदे यांनी क्रीडा महोत्सव स्थगित केल्यानंतर शोकसभा घेण्यात आली. त्यावेळी करवा यांच्या स्मरणार्थ क्रीडास्पर्धा आयोजित करून त्यांच्या स्मरणार्थ बक्षीस देण्यात यावी, अशी मागणी सर्व खेळाडू जेष्ठाकडून करण्यात आली.