अहंकार धुळीस मिळाला!

    दिनांक : 12-Jun-2022
Total Views |

प्रहार

- दिलीप धारूरकर

Rajya Sabha elections राज्यसभा निवडणुकीत सहावी जागा अखेर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी जिंकली.

 
lokasabha 

 

शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला. 'आमच्याकडे आमदारांचा पाठिंबा आहे, आम्ही काहीही करू शकतो' असा एक अहंकार गेली अडीच वर्षे महाराष्ट्रातील सत्ताधाèयांच्या प्रत्येक कृतीतून दिसत होता, तो अहंकार या निवडणुकीत अक्षरश: धुळीस मिळाला. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून शपथविधीपासून ते Rajya Sabha elections राज्यसभा निवडणुकीतील उमेदवार ठरविण्यापर्यंत सतत अनेक कृतीतून, वक्तव्यांतून हे सरकार आणि त्यातील घटक पक्ष यांचा अहंकार सातव्या मजल्यावर गेल्याचे दिसत होते. या आधीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या सोबत सरकारमध्ये सहभागी असताना मिळून केलेल्या निर्णयांना हटकून स्थगिती देताना, त्यावेळी सुरू केलेल्या योजना जिथल्या तिथे थांबवताना, संधी मिळेल तेव्हा भाजप, फडणवीस, मोदी यांना टोमणे मारताना सरकार आणि त्यातील नेते यांचा अहंकाराचा दर्प सतत जाणवत होता. या अहंकार जाणवण्यातील अस्वस्थताच राज ठाकरे यांच्या पत्रातील 'कोणीही ताम्रपट घेऊन आलेला नाही.' या वाक्यातून व्यक्त झाली होती.
 

Rajya Sabha elections : पोलिस खात्याचा वापर अगदी कोरोनाकाळापासून सुरू झाला. वाधवान या आरोपीला मुक्त परवाना देण्यातून, पालघर येथील हत्याकांडातील आरोपींकडे डोळेझाक करण्यातून, अर्णव गोस्वामीवर अनेक एफआयआर दाखल करण्यातून, अर्णवला घरात घुसून अतिरेक्याला अटक करावी तसे अटक करण्यातून, कंगनावर अनेक आरोप लावण्यातून, मनसुख हिरेनच्या हत्येतून, पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यातून आणि रद्द करण्यातून, सचिन वाझे याला पुन्हा नोकरीत घेण्यातून, त्याला 'तो काय ओसामा बिन लादेन आहे काय' असे म्हणत त्याची पाठराखण करण्यातून, परमबीर सिंगचा उपयोग करून विरोधी विचारांच्या लोकांवर दबाव आणण्यातून आणि नंतर परमबीर सिंग यांच्यावरच अनेक गुन्हे दाखल करण्यातून, रेमडेसिविर टंचाईतही पुरवणाऱ्या उद्योजकाला मध्यरात्री पोलिस ठाण्यात नेण्यातून, नारायण राणे यांच्यासारख्या केंद्रीय मंत्र्याला अटक करण्यातून, अनेक सामान्य माणसांना केवळ समाजमाध्यमांवर अभिव्यक्त झाले म्हणून अटक करण्यातून, किरीट सोमय्या यांना अडवण्यातून हे सरकार पावलोपावली अहंकाराचे दर्शन घडवत होते. मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. या सत्तेचा उपयोग पाहा कसा केला. कंगना राणावत यांना 'थोबाड फोडण्याची' धमकी देण्यातून आणि नंतर तिच्या घरावर, ती नसताना, बुलडोझर चालवत 'उखाड दिया' असे म्हणण्यातून, नारायण राणे यांच्या घरावर अनेक नोटिसा बजावत दहशत निर्माण करण्यातून, राणा दाम्पत्यावर नोटीस बजावण्यातून, मोहित कंबोज यांच्या घरावर नोटीस बजावण्यातून अहंकार दिसत आला आहे. विधिमंडळापासून ते जाहीर सभांमधून, मुखपत्रातून ते पत्रकार परिषदांमधून सतत भाजपला आणि विनाकारण रा. स्व. संघाला टोमणे मारण्यातूनही अहंकाराचेच दर्शन घडत होते. कोरोना काळात, वादळात, पुरात, दुष्काळात अशा अनेक संकटांत सर्वांना सोबत घेऊन संकटांचा सामना करण्याऐवजी केवळ घोषणा करण्यातून सत्तेचा अहंकारच दिसत होता. भास्कर जाधव यांच्यासारखे आमदार लोकांचाही अवमान करत होते. संसदीय कामकाजात बारा आमदारांचे निलंबन करण्यापासून ते अर्णव गोस्वामीला काही मिनिटात हजर होण्याची नोटीस देण्यापर्यंत हाच अहंकार दिसत होता.

 

Rajya Sabha elections राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली. पहिल्यांदा लोकांना नसली तरी आमदारांना अभिव्यक्त होण्याची संधी मिळाली. या निवडणुकीत उमेदवार ठरवताना छत्रपतींचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत जे डावपेच खेळले गेले ते सर्वांसमोर आहेत. त्यामधून कोणता भाव सत्ताधारी पक्ष लोकांसमोर प्रकट करत होता ? ना छत्रपतींचा आदर ना पारदर्शी भूमिकेची स्वच्छता. मग मावळा, राजे असे म्हणत शेवटपर्यंत विषय झुलवत ठेवला. मग संजय पवार यांचे नाव एकतर्फी घोषित करून टाकले. यातही अहंकार होता तो संख्येचा. एकच घोषा होता 'आमच्याकडे पुरेशी संख्या आहे आणि आमचे चारही उमेदवार निवडून येणार.' आम्ही कोणालाही निवडून आणू शकतो हा दर्प त्यामध्ये प्रत्येक विधानात जाणवत होता. राज्यसभेची चर्चा चालू असताना रोज हेच सांगितले जात होते की आघाडी एकसंध आहे. आमदारांची पुरेशी संख्या आहे. चारही उमेदवार विजयी होतील. अगदी सरकार स्थापन करतेवेळी जी हॉटेलमध्ये सर्व आमदार ठेवण्याची योजना केली होती तशी योजना करण्यात आली. Rajya Sabha elections राज्यसभेच्या मतदानात मतदार आमदाराने आपल्या पक्षाने नेमलेल्या Rajya Sabha elections निवडणूक प्रतिनिधीला दाखवून मत पेटीत टाकायचे असल्याने धोका होण्याची शक्यता नव्हती. मात्र अपक्ष आणि छोटे पक्ष यांच्या आमदारांना हे लागू नव्हते.

 

Rajya Sabha elections : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन अडीच वर्षे झाली आहेत. अर्धा कालावधी झाला आहे. लोकांना या सरकारचे अस्तित्व त्यांच्या रोजच्या जीवनात बिलकूल जाणवत नाही. कोरोना आला तर हे सरकार केंद्राच्या नावाने प्रत्येक बाबतीत खडे फोडत राहिले. परप्रांतातील मजूर आपापल्या गावाकडे परत निघाले तर त्यांची आधी काहीच सोय केली नाही. सोनू सूदसारखा अभिनेता त्यांची मदत करू लागला तर त्याच्यावर टीकेची झोड उठवत त्याला राजभवन माहीत आहे, पण मातोश्री माहीत नाही असे बोलले गेले. तो बिचारा मातोश्रीवरही गेला. तरीही त्याला मजुरांना पाठविण्यासाठी रेल्वेस्थानकावर येऊ दिले गेले नाही. यातून सत्तापक्षाचा अहंकार फक्त दिसत होता. सेवेतही अहंकार. मग कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात, सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात. असे असूनही सरकार केंद्र सरकारच्या नावाने ओरडत होते. वर एक नंबर मुख्यमंत्री आणि एक नंबर राज्य ही फोडणी आहेच.

 

Rajya Sabha elections : पेट्रोलचे भाव वाढताच सत्तापक्षाला मोदीद्वेषाने पछाडलेले असल्याने त्याबाबत ओरड सुरू झाली. सरकारप्रायोजित आंदोलने घडू लागली. बैलगाड्या, सायकल रॅली निघाल्या. पुढे केंद्राने अचानक पेट्रोल, डिझेल दरात दोनवेळा कर कमी करून भाव घसघशीत कमी केले. अनेक राज्यांनी त्यांचाही कर कमी करून आणखी भाव कमी केले. महाराष्ट्र सरकारने मात्र एक पैसाही भाव कमी केला नाही. उलट केंद्र सरकारवरच टीका केली की, 'आधी भाव वाढवले आणि नंतर थोडे कमी केले.' मात्र राज्य सरकार काहीच करत नाही हे लोकांना कळलं. शेतकऱ्यांना मदत नाही. कसलीही योजना नाही. अशा अनेक गोष्टींमुळे राज्य सरकार नावाची गोष्ट लोकांना जाणवतच नाही. फक्त केंद्र सरकारवर टीका करण्याइतकेच आणि लोकप्रिय असलेल्या नरेंद्र मोदी यांचा द्वेष करण्याइतकेच या सत्ताधीशांचे अस्तित्व जाणवते. विरोधी नेत्यांना सरळ करण्यासाठी सत्तेचा वापर करताना यांचा दर्प जाणवतो.

 

या गोष्टींमुळे जनतेतील नाराजी आता लोकप्रतिनिधींना जाणवू लागली आहे. असेच चालू राहिले तर पुढील निवडणुकीत जनतेला सामोरे जाणे अवघड होईल आणि पुन्हा निवडून येणे त्याहून अवघड होईल असे त्यांना जाणवू लागले आहे. त्यामुळे सरकारचे समर्थन करणारे अपक्ष आमदार, छोटे पक्ष हे अस्वस्थ आहेत. अगदी या सरकारमध्ये मंत्रिपदावर विराजमान झालेले अपक्ष सुद्धा मोकळेपणाने सरकारची बाजू घ्यायला तयार नाहीत. Rajya Sabha elections राज्यसभा निवडणुकीत या नाराजांना व्यक्त होण्याची एक संधी मिळाली. उघड मतदान असूनही तब्बल दहा मते फुटली. आपल्याला मिळणाèया मतांचे विरोधी पक्षनेत्यांनी अतिशय चांगले नियोजन केले आणि भारतीय जनता पक्षाचे तीनही उमेदवार निवडून आले. संख्या असल्याचा दावा करणाèया सत्ताधाèयांचा चौथा उमेदवार पराभूत झाला. मात्र तरीही अहंकार जात नाही. सत्तारूढ आघाडीचे विश्वप्रवक्ते राज्यसभेचे निकाल जाहीर झाल्यावर माध्यमांसमोर येऊन काय म्हणाले ते सरकारची भूमिका दर्शविते. ते म्हणाले, ''आमचा उमेदवार पराभूत झाला असे मी म्हणणार नाही, पण तो विजयी होऊ शकला नाही. भारतीय जनता पक्षाने नक्कीच जागा जिंकली पण त्यांचा विजय झाला असे मी मानत नाही.''याला सातव्या मजल्यावर पोहोचलेला अहंकार म्हणतात. यात पराभव सुद्धा पराभव वाटत नाही. आपलेच बरोबर असे वाटत राहते. शरद पवार हे धूर्त असल्याने त्यांनी मोकळेपणाने कबूल करून टाकले की, ''हा विरोधी पक्षनेते फडणवीस यांचा चमत्कार आहे.''

 

या Rajya Sabha elections राज्यसभा निवडणुकीत सत्तारूढ आघाडीतील मतभेदही चव्हाट्यावर आले आहेत. ठरलेल्या कोट्यापेक्षा जास्त मते काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी आपापल्या उमेदवाराला दिली आहेत. या निवडणुकीत खुले मतदान होते. आता लगेच विधान परिषदेची निवडणूक आहे. त्यात गुप्त मतदान आहे. त्यामुळे मोठा धमाका विधान परिषद निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. या पराभवाचे संकेत लक्षात न घेता त्याला 'घोडेबाजार' असे म्हणायचे अशा प्रकारे सरकार आणि त्यांचे कर्ते करविते अहंकाराच्या कैफातच राहिले तर त्यांना भविष्यात होणाऱ्या नुकसानीपासून कोणीच वाचवू शकणार नाही. अहंकार धुळीस मिळाला असे निवडणूक निकाल लांबून पाहणाऱ्यांना वाटते मात्र प्रत्यक्ष ज्यांचा अहंकार सातव्या मजल्यावर पोहोचला आहे त्यांना तसे वाटत नाही. त्यांना तिथे पोहोचल्यावर आपणच सर्वात उंच. आपण करतो ते बरोबर असेच वाटत राहते. पराभवानंतरही विश्वप्रवक्त्यांच्या भाषेतून तसेच जाणवते आहे. त्यामुळे अहंकाराचा परिणाम निवडणूक निकालातून दिसला, मात्र अहंकार धुळीस मिळाला असे मात्र म्हणता येत नाही हे दुर्दैव!