देशोद्धारासाठी हवे शिक्षण

    दिनांक : 11-Jun-2022
Total Views |


वेध


आचार्यकुल पद्धतीत आश्रमात जाऊन Teaching शिक्षण घ्यावे लागत होते. ते शिक्षण काही विशिष्ट लोकांकरिता होते.

त्या शिक्षण पद्धतीत हळूहळू बदल होत गेला. समाज व्यवस्थेतही बदल झाला. शिक्षणावर प्रत्येकाचा अधिकार झाला. जे सुरुवातीपासूनच व्हायला हवे होते, त्यात कालांतराने बदल झाले. ती काळाची गरज होती. मात्र, त्याही परिस्थितीत एकलव्य निर्माण झाला. याचा अर्थ ज्याला शिक्षणाची जिद्द असते तो आपले ध्येय साध्य केल्याशिवाय राहत नाही. आपली आई आपल्याला पहिली ओळख करून देते तर दुसरी ओळख शिक्षणाने निर्माण होेते. आपल्या व्यक्तिमत्त्वाला सुवर्ण झळाळी प्राप्त करून देते ते शिक्षण. शिक्षणाचे सुरुवातीला उदात्तीकरण झाले आणि त्यात व्यापारीकरणाचा चंचुप्रवेश झाला.

 
 
 
 
education
 
 
 
Teaching शिक्षणक्षेत्रात प्रचंड स्पर्धेचा शिरकाव झाला. आम्हाला शिक्षण म्हणजे रग्गड वेतनासाठी डिग्री हवी असते. त्यात आपल्या पाल्याने काय व्हावे हे महाभाग पालक ठरवतात आणि आपल्या पाल्याच्या गुणवत्तेचा विचार न करता फक्त स्पर्धेत उतरवतात. या पालकांमधील स्पर्धेचा फायदा शिक्षणाच्या व्यापारीकरणाला नफ्याकडे घेऊन गेला, हे आपल्या ध्यानीही आले नाही.

या Teaching च्या व्यापार्‍यांनी पालकांसह विद्यार्थ्यांमध्येही स्पर्धा निर्माण केली. सरस्वतीची मंदिरे आरशासारखी चकचकीत बहुमजली पंचतारांकित झाली आणि शिक्षणाचा ट्रेंडच बदलला. पहाटेपासून रात्रीपर्यंत घोकंपट्टीचा अभ्यास आला. रट्टा मारून अभ्यास करावा लागतो आहे आणि तो करून घेतलापण जात आहे. त्यामुळेच शिकवणी वर्गाचे खूळ वाढले आहे. नर्सरीपासून ते पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी शिकवणी अत्यावश्यक झाली. एकदा शाळा-महाविद्यालयातील प्रवेशासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची ओढाताण होणार नाही. परंतु, नावाजलेल्या शिकवणी वर्गात प्रवेशासाठी हवा तेवढा पैसा मोजला जातो. शाळा-महाविद्यालयांतील शिक्षकांपेक्षा शिकवणी वर्गातील शिक्षक जास्त महत्त्वपूर्ण ठरू लागले. आयुष्यात नोकरीसाठी शिक्षण असल्याचे बिंबवले गेल्याने तेच साध्य करण्याची चढाओढ सुरू झाली आहे. त्या चढाओढीचे प्रतिबिंब तीन दिवसांपूर्वी लागलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालातही उमटलेले आहे. जे साध्य करायचे होते त्या साध्याच्या पहिल्या पायरीवरील गुणवत्ता त्या विद्यार्थ्याच्या परिश्रमाची पावती देणारी ठरत आहे. ते परिश्रम शिकवणी वर्गाचे असो की घोकंपट्टीचे. पण, जे यश मिळाले ते वाखाणण्याजोगेच आहे. Teaching शिक्षण सर्व सोयीयुक्त झाल्याने निकालाची टक्केवारीही तेवढ्याच वेगाने वाढू लागली आहे. कोरोना काळातील एकदम उंचीवर गेलेल्या निकालाचा अपवाद वगळता 2018 मध्ये 88.41 टक्के, 2019 मध्ये 85.88 टक्के, 2020 मध्ये 90.66 टक्के, 2021 मध्ये 99.63 (कोरोना काळ) तर यावर्षी 94.22 टक्के राज्यात बारावीचा निकाल लागला. दुसरीकडे 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर केलेल्या निकालात 91 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले होते. 2020 मध्ये झालेल्या प्रत्यक्ष परीक्षेच्या निकालात 7 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. यंदा 2022 मध्ये प्रत्यक्ष पद्धतीने झालेल्या परीक्षेत 10 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले.
 

2020 मध्ये झालेल्या प्रत्यक्ष परीक्षेच्या निकालाच्या तुलनेत यावर्षीच्या निकालात 3.56 टक्के वाढ झाली. माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात वाढत जाणारी ही पिढी तेवढीच तल्लख आहे. भविष्यात ही पिढी उच्च Teaching शिक्षणातही आघाडी घेतल्याशिवाय राहणार नाही. मात्र, आज त्यांनी मिळविलेल्या गुणांनी त्यांची जबाबदारी वाढलेली आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी संगणक युगात भारताचा प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठ वर्षांच्या कार्यकाळात देशाने अधिकच प्रगती केली. आज भारत शिक्षणातही आघाडीवर आहे. आपल्या संस्कृतीने 'मातृदेव भव:', 'पितृदेव भव:' आणि 'आचार्य देवो भव:' ही शिकवण दिली आहे. याला दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी 'राष्ट्रदेवो भव:' ही संकल्पना जोडली. पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने नवीन Teaching शैक्षणिक धोरण आखले आहे. त्या धोरणातून रोजगाराभिमुख शिक्षणावर भर देण्यात आला आहे. आम्ही आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करीत असताना विदेशात जाऊन फक्त रग्गड वेतनाचेच ध्येय ठेवताना आपल्या हुशारीचा फायदा या देशाच्या प्रगतीसाठी कसा करता येईल, याचाही विचार व्हावा; तेव्हाच 'राष्ट्रदेवो भव:' ही संकल्पना रुजू लागेल. आपल्या हुशारीचा देशाच्या विकासात खारीचा वाटा असावा, याचाही विचार व्हावा, नाही का?

 
- प्रफुल्ल व्यास
 

- 9881903765