हे चाललंय् तरी काय?

    दिनांक : 10-Jun-2022
Total Views |


वेध


गेल्या काही वर्षांत मोबाईल हातोहाती खिळल्यासारखा झाला आहे. कोरोना काळात तो आणखीनच जवळ आला. आबालवृद्धांपासून सारेच या यं त्रात आपली आवड शोधून गुंतायला लागले.

 
 
 
spot

 

 
 
 
ज्यांची मुले परदेशात किंवा दुसर्‍या शहरात नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत त्या 'साठी' उलटलेल्या माय-बापांसाठी मोबाईल म्हणजे टीव्हीपेक्षाही जवळचा सोबती झाला आहे. त्यांना एका अर्थाने हे वरदानच आहे. मात्र, Mobile games मोबाईलमुळे होणारे डोळ्यांचे, हाताचे, खांद्याचे, बोटांचे, डोक्याचे आजार लक्षात घेता त्यांनीही फार काळ मोबाईलप्रेम जपायला नकोच. दुसरी पिढी म्हणजे सध्या कर्तृत्व गाजवणारी घरातील कर्ती मंडळी. त्यांना कार्यालयीन कामासाठी मोबाईल हवाच असतो. तिथे फार जास्त तडजोड करता येत नाही. मात्र, घरातील तिसरा घटक म्हणजे लहान मुले ज्यांना खरे तर मोबाईल जवळ करण्याची फारशी गरजच नाही. मात्र, ती या यंत्राच्या अक्षरश: आहारी गेली आहेत. कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणामुळे तर मुलांच्या हाती मोबाईल देणे गरज बनली. ऑनलाईन शाळा, शिक्षण आटोपते घेत सरकारने सारे काही ऑफलाईन करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही मुलांचे मोबाईल व्यसन काही केल्या सुटत नाही. त्यातही कहर म्हणजे, Mobile games मोबाईलवर असणार्‍या वेगवेगळ्या गेम्समध्ये ते स्वत:ला इतके गुंतवतात की त्यातून डोके वर काढणेही जड जाते. काही दिवसांपूर्वी एक विनोद वाचण्यात आला की, पूर्वी लहान मंडळी मोठ्यांना आदर देण्यासाठी उठून उभी राहत होती, आता त्यांनी मोबाईलमधून डोके वर काढले तरी पुरेसे असते.
 

Mobile games मोबाईल गेम्समुळे त्यातही पबजीसारख्या खेळामध्ये तर अनेक किशोरांनी आपला जीव दिला आहे. इतकी टोकाची भावनिक गुंतवणूक खरे तर अध्यात्मातच राहू शकते, असे म्हटले पाहिजे. मात्र, अध्यात्मातही आजकाल कोणी साधक स्वत:ला इतके गुंतवत नसतील. कारण शेवटी जीव आहे तर सारे काही आहे. मोबाईल गेम्सच्या आहारी गेलेली मुले कुटुंबापासून, मित्रमंडळींपासून साहजिकच दुरावतात. त्यांचे स्वत:चे एक जग निर्माण झालेले असते. त्यातील घडामोडींमध्ये ते इतके गुंततात की त्यातून स्वत:ला बाहेर काढण्याची त्यांची इच्छाच उरत नाही. मोबाईल गेम खेळू दिला नाही म्हणून एका पबजीप्रेमी किशोराने आपल्या जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केली. एवढेच नाही, एका 16 वर्षीय किशोराने Mobile games मोबाईलवर गेम खेळू न दिल्याने रेल्वेखाली आत्महत्या केली. त्याने चिठ्ठी लिहून ठेवली; त्यात याचा उल्लेखही केला. अशा कारणांनी जर आत्महत्या, हत्या घडत असतील तर मोबाईल मुलांच्या हातात पडता कामा नये, याची पालकांनी योग्य त्या संस्कारक्षम वयापासूनच काळजी घेतली पाहिजे. पण दुर्दैवाने असे होत नाही.

 

Mobile games : माय-बाप अगदी तान्हुल्याच्या हातातही स्वत:चे कुतुहल म्हणून फोन देतात आणि त्यात त्याला चित्र, गाणे, कार्टून दाखवतात. अगदी बोलताही न येणारी चिमुकली बाळे हातात मोबाईल घेऊन निरीक्षणाने आणि सवयीने ती अ‍ॅप सराईतासारखे सुरू करतात. त्याच्या या सराईतपणाचे हुशारी म्हणून माय-बाप तोंडभरून कौतुक करतात आणि नंतर कलेकलेने वाढणार्‍या तान्हुल्यासोबत त्याचे मोबाईलप्रेमही वाढत जाते. हाच चिमुकला अजाणत्या वयात मोबाईलवर तासन्तास घालवू लागतो. कालांतराने तो मोबाईलच्या आहारी गेल्याची धक्कादायक बाब पालकांना समजते आणि त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरू होते. मात्र, ज्या घरी आई, वडील सारेच मोबाईलमध्ये गुंतलेले असतात तिथे त्या उमलत्या वयातील चिमुकल्यांनाच दोषी कसे मानायचे? टीव्हीवरील, इंटरनेटवरील नको ते साहित्य सरकारने सेन्सॉरच्या कैचीने कचाकचा कापले. मात्र, मोबाईल गेम्सचे भूत अजूनही नव्या पिढीच्या आणि एकूणच समाजाच्या मानगुटीवर बसलेलेच आहे. धोकादायक गेमिंग अ‍ॅपवर काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने कारवाई केली. प्ले स्टोअरमधील अनेक Mobile games गेम्स आणि अ‍ॅप्सवर बंदी घातली. ही तजवीज पुरेशी नाही. नव्या पिढीला वाचवायचे असेल तर घरातूनच आधी प्रतिबंधात्मक उपाय व्हायला हवेत. संस्कार, शिक्षण, मैदानी खेळांचे आकर्षण, पुस्तक वाचनाची गोडी, आजी-आजोबा, आई-बाबांनी छान छान गोष्टी सांगण्याचे, कविता शिकविण्याचे अनुभव हे सारे काही उमलत्या वयातील मुलांना पुन्हा मिळाले पाहिजे. यापूर्वीच्या पिढीला हा सर्व आनंद मिळाला. आता नव्या पिढीसाठी सध्या असलेल्या थोरल्या पिढ्यांनी कंबर कसली पाहिजे. मोबाईल हे यंत्र त्याच्यासाठी नाहीच, हे त्याच्या मनावर ठसले पाहिजे. तरच आगामी काळात ही नवी पिढी आपल्याला हवी तशी घडण्याची आशा राहील.

 
- सोनाली ठेंगडी 

- नागपूर