युक्रेन करणार रशियावर हल्ला ; रशियावरील हल्ल्यासाठी अमेरिका पाठवणार आधिक प्रगत क्षेपणास्त्र

    दिनांक : 01-Jun-2022
Total Views |
किव्ह : गेल्या तीन ते चार महिन्या पासून रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरु असून, रशियातर्फे युक्रेनच्या पूर्वेकडील भागात रशिया आक्रमण थांबविण्याचे नावाचं घेत नाही.  दरम्यान, रशियाच्या वाढत्या आक्रमणानंतर अमेरिका युक्रेनच्या मदतीला पुढे धावली आहे. रशियावरील हल्ल्यासाठी अमेरिका आधिक प्रगत क्षेपणास्त्र पाठवणार आहे, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केली आहे. विशेष म्हणजे यासाठी प्लानदेखील सांगण्यात आला आहे.
 
 

ucrane
 
 
 
युक्रेनला अधिक प्रगत रॉकेट प्रणाली आणि युद्धसामग्री प्रदान करण्याचा अमेरिकेने निश्चय केला आहे. ज्यामुळे ते युद्धभूमीवरील लक्ष्यांवर अधिक अचूकपणे हल्ला करू शकतील. परंतु, रशियावर हल्ला करू शकणारी रॉकेट यंत्रणा युक्रेनला पाठवणार नसल्याचे बायडेन यांनी स्पष्ट सांगितले आहे.
 
रशियन शस्त्रांपेक्षा अधिक अचूक?
 
व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, नवीन शस्त्रांमध्ये M142 हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टमचा (HIMARS) समावेश असेल. मात्र, याचा किती पुरवठा केला जाणार आहे हे त्यांनी स्पष्ट केले नाही. ही शस्त्रे रशियन समकक्षांपेक्षा अधिक अचूक मानली जातात.
 
युक्रेनच्या लष्करप्रमुखांनी नुकतेच सांगितले की, रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यांना तोंड देण्यासाठी HIMARS महत्त्वपूर्ण ठरणार असून, याचा वापर पूर्वेकडील डॉनबास प्रदेशात ज्या ठिकाणी तीव्र युद्ध सुरू आहे, त्या ठिकाणी रशियन सैन्यावर हल्ला करण्यासाठी केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.