हे खरे पालकत्व...

    दिनांक : 01-Jun-2022
Total Views |

वेध


रक्ताचे नाते घट्ट असते, असे म्हटले जाते. मात्र हा समज आता इतिहास जमा व्हायला आला आहे. अशी रक्ताची अनेक नाती अगदी सहज विखुरलेली आपण पहातो.

 
 
 
modiji

 

 
 
मात्र जिथे प्रामाणिकपणा आणि आपुलकी असेल तिथे रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट नातं तयार होतं आणि अशा नात्यात पालकत्व स्वीकारणारी व्यक्ती नात्याविषयी एकनिष्ठ असते, हेच खरे! PM Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाशी जुळलेले नाते आणि त्यांनी देशाच्या प्रत्येक नागरिकाचे स्वीकारलेले पालकत्व उघड आहे. अशाच आदर्श पालकत्वाचा पुन्हा एकदा त्यांनी परिचय दिला, तो कोरोनात पालकांचे छत्र गमावलेल्या मुलांना खंबीर आधार देत. शैक्षणिक, आरोग्य आणि दैनंदिन गरजा पूर्ण होण्याच्या दृष्टीने मदत देण्याचा घेतलेला निर्णय आणि त्याची केलेली सुरुवात बरेच काही सांगून जाते.
 

कोरोनाने अनेकांना उघड्यावर आणले. आर्थिकदृष्ट्या तुटलेल्या लोकांची व्यथा जगजाहीर असतानाच अनेकांचे आई-वडिलांचे छत्र हिरावले गेले. आधार गमावलेले अनेक पाल्य आज स्वत:च्या पायावर उभे होण्यासाठी आधार शोधत असताना देशाचे PM Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर्स अंतर्गत घेतलेला निर्णय नक्कीच कौतुकास्पद आहे. अनेक जण आज अनाथ झाले. ज्याला रक्ताची नाती म्हणतात, अशी नाती जपायला माणसं आहेत. पण ती जपण्याची इच्छा किंवा मानसिकता अनेकांमध्ये नाही. म्हणून आज रक्ताचा हक्काचा माणूस असतानाही अनेक मुलं-मुली अनाथ म्हणून जगत आहेत. स्वत:च्या पायावर उभे होत काहीतरी करून दाखविण्याची जिद्द असली तरी त्याला पाठबळाची गरज असते आणि तेच मिळण्यासाठी अशा अनेक पाल्यांची धडपड सुरू आहे. कुणी शिक्षणासाठी तर कुणी आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तर कुणी दैनंदिन गोष्टी पूर्ण व्हाव्यात म्हणून आधार शोधताना दिसतो. समाजसेवा करण्याच्या नावाने मदतीचा देखावा करून फोटो काढून मिरविणारे अनेक दिसतील. मात्र कोणताही स्वार्थ न ठेवता नि:स्वार्थ भावनेने कायमस्वरूपी धीर देणार्‍यांचे प्रमाण फारसे कमी पहायला मिळते. बरेच जण अशा मुलांचे पालकत्व स्वीकारल्याचे भासवितात. मात्र ते किती काळ टिकणारे असते, हे कुणीच सांगू शकत नाही.

 

आज अशा सर्वस्व गमावलेल्यांना एका खंबीर आधाराची गरज आहे आणि हाच आधार देण्याचे काम देशाचे PM Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. कोरोना काळात ज्या पद्धतीने सर्व आघाड्यांवर PM Narendra Modi पंतप्रधानांनी देशातील प्रत्येक नागरिकाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्याच पद्धतीने कोरोनानंतर सर्वस्व गमावलेल्यांसाठी त्यांनी पाऊल उचलले. त्यांच्या कल्पनेतून साकारलेल्या पीएम चिल्डे्रन केअर्स अंतर्गत दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी 18 ते 23 वर्ष वयोगटातील मुलांना दरमहा 4 हजार रुपये विद्या वेतन देण्याचा निर्णय घेत त्याची सुरुवात दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमातून त्यांनी केली. व्यावसायिक अभ्यासक्रम आणि उच्च शिक्षणासाठी सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणा त्यांनी केली. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत 5 लाखापर्यंत आरोग्य विमा देण्याचे सांगून अशा बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा संकल्प PM Narendra Modi पंतप्रधानांनी सोडला आहे. आई-वडिलांना गमावल्याने अनाथ झाल्याची भावना येऊ नये आणि त्यांचे आयुष्य दिशाहीन न होता मार्गी लागावे या उदात्त हेतूने हा निर्णय घेण्यात आला असावा. देशातील हजारो अनाथ झालेल्या बालकांना आता या उपक्रमांतर्गत मदतीचा हात मिळणार आहे. शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन व्यवहाराची काळजी घेत अशा मुलामुलींचे आयुष्य घडविण्यासाठी घेतलेली भूमिका नक्कीच देश घडविण्याच्या दृष्टीने प्रभावी ठरेल, यात शंका नाही.


 

आज हक्काचे लोक दूर जात असताना PM Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निभविलेले पालकत्व रक्ताच्या नात्यापेक्षाही मोठे आहे. समाजातील सर्वच स्तरातील लोकांची काळजी करून त्या दृष्टीने निर्णय घेण्याची क्षमता असलेले पंतप्रधानांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व आज देशाचे पालकत्व खंबीरपणे स्वीकारण्यासाठी समर्थ आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. आज जे कोरोनात अनाथ झाले, ज्यांना सर्वस्व गमविल्याची जाणीव झाली होती, त्यांना या निर्णयामुळे कुणीतरी पाठीशी खंबीरपणे उभे आहे, याचा नक्कीच आनंद झाल्याशिवाय राहणार नाही.

 
- विजय निचकवडे
 

-9763713417