श्रीलंकेत हिंसाचार, सत्ताधारी पक्षाच्या खासदाराचा मृत्यू, अनेकजण जखमी;पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्याचा परिणाम

    दिनांक : 09-May-2022
Total Views |
कोलंबो: पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर श्रीलंकेत हिंसाचाराला सुरुवात झाली आहे. यामध्ये आता सत्ताधारी पक्षाच्या एका खासदाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे श्रीलंकेचा प्रवास यादवीकडे सुरु झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
 
shrilanka1
 
 
अमरकीर्ती अथूकोरला असं या मृत्यू झालेल्या खासदाराचं नाव आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षेंनी काहीच वेळापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांचे समर्थक आणि विरोधी पक्षाचे कार्यकर्ते यांच्यात हिंसाचारास सुरुवात झाली. या हिंसाचारामध्ये सत्ताधारी पक्षाच्या खासदाराचा मृत्यू झाला आहे, तसेच आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 139जण जखमी झाले आहेत.