शाळेविना पर्याय नाही

    दिनांक : 31-May-2022
Total Views |

वेध


कोरोनाने संपूर्ण school जग उद्ध्वस्त झालंय. सर्वच क्षेत्राची वाताहत झाली. दोन वर्षांनंतर या महामारीतून जग कसेतरी सावरताना दिसत आहे.

 
 
 
school1

कोरोनाने जगभर झालेली ही अपरिमित हानी कशी भरून निघणार हा एक प्रश्नच आहे. शालेय शिक्षणही त्यामधून सुटले नाही. या महामारीने विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान केले. विद्यार्थ्यांच्या सवयी, लिहिण्याचा व वाचण्याचा सराव, शाळेत जाण्याचा कंटाळा, अध्ययनक्षमता, गणित व विज्ञान विषयांबाबत विद्यार्थ्यांमध्ये आलेले नैराश्य, या सर्व धक्कादायक बाबी राष्ट्रीय सर्वेक्षणात समोर आल्या आहेत. त्यामुळे पालकवर्गही चांगलाच धास्तावला आहे. नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हेमध्ये या सर्व धक्कादायक बाबी समोर आल्या असून, शाळेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटत असल्याची बाब अधोरेखित झाली आहे. कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या लिहिण्या-वाचण्याच्या क्षमतेत घसरण झाली असून, त्यांच्या अध्ययनक्षमतेवरही परिणाम झाला आहे. झालेल्या राष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये आठवीपासून पुढच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे school शिक्षण कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झाल्याचे म्हटले आहे.

 

देशभरातील 1.18 लाख school शाळांमधील 34 लाख विद्यार्थ्यांबाबत हे सर्वेक्षण करण्यात आले. शाळेमध्ये सराव न झाल्याने विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान हे विषय शिकणे आव्हानात्मक ठरत असल्याचेही सर्वेक्षणात नमूद केले आहे. त्यामुळे आभासीऐवजी प्रत्यक्ष शाळा अधिक सरस असल्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटू लागले आहे. खाजगी शाळांपेक्षा सरकारी शाळांची स्थिती सर्वांनाच परिचित आहे. सरकारी शाळेतील 10 वीच्या विद्यार्थ्यास आपल्या नावाचे इंग्रजीत साधे स्पेलिंगही लिहिता येत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे या शाळा बंद असताना आभासी पद्धतीने शिकून तो काय दिवे लावेल, हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिष्याची गरज नाही. खाजगी शाळांची फी परवडत नाही म्हणून सरकारी शाळेत जाणारा विद्यार्थी हा गरीब व मध्यमवर्गीय. वरून कोरोनाचा कहर. या काळात शाळा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांची school शाळेची सवय तुटली. त्यामुळे त्यांच्या एकाग'तेवरही परिणाम झाला. मित्रवर्गही दुरावला. एकंदरीत सामूहिकरीत्या राहणारा विद्यार्थी एकटा पडल्याने त्यांच्यात नैराश्य पसरले. सतत मोबाईल अन् तो; त्यामुळे तो एकलकोंडा झाला.

 

सकाळी 11 ते 5 या वेळेत स्वच्छंद विहार करून school शिकणारा विद्यार्थी ज्यावेळी अभासी पद्धतीच्या शिक्षणावर गेला त्यावेळीच त्याच्या प्रगतीची दारे बंद झाली, हे आता स्पष्टपणे दिसून आले आहे. महामारीच्या काळात शाळा बंद झाल्यावर विद्यार्थिवर्गात आनंदी वातावरण होते. शाळेच्या कटकटीतून एकदाचा मुक्त झालो, अशी त्यांची भावना झाली होती. परंतु, हे ग्रहण आपल्या भावी आयुष्याची राखरांगोळी करू शकते; याची पुसटशी कल्पनाही त्यावेळी ना पालकांना आली ना विद्यार्थ्यांना. जवळपास दीड वर्ष शाळा बंद असल्याने मुले भरकटली. ती नियंत्रणमुक्त झाली. त्यामुळे त्यांच्या बुद्ध्यांकावरही परिणाम झाला. त्यानंतर शाळा सुरू झाल्यावर भरकटलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याचाही कंटाळा येऊ लागला. लहानपणापासून शाळेत जाण्याची सवय सुटल्याने त्याचे होणारे दुष्परिणाम कोरोना ओसरल्यावर पालक व विद्यार्थ्यांच्या लक्षात आले आहेत. त्यामुळे school शाळेत जाऊन शिकल्याविना पर्याय नाही, हे एकदा पुन्हा सिद्ध झाले आहे.

 

शाळेतील school शिक्षक व विद्यार्थी यांचे गुरू-शिष्याचे पवित्र नाते असते. गुरू आणि शिष्य ही भारताची एक परंपरा आहे. त्यामुळे आदरयुक्त भीतीने विद्यार्थी शाळेमध्ये विद्या ग्रहण करतो. शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांवर शिक्षकांची एकसारखी नजर असते. कोण कच्चा कोण पक्का याची नेमकी जाणीव शिक्षकांना असते. त्यामुळे कोणाकडून कशी उजळणी घ्यायची, कच्च्या विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक कसा वाढवायचा याचा अभ्यास व अंदाज शिक्षकांना बरोबर असतो. त्यामुळे शाळेविना विद्यार्थी अपूर्णच. तो शाळेविना घडूच शकत नाही, हे कोरोनाने शिकविलेले एक जिवंत उदाहरण. त्यामुळे school शाळेविना उद्धार नाही, ही खूणगाठ विद्यार्थ्यांनी मनाशी पक्की बांधावी.

 
-चंद्रकांत लोहाणा
 

- 9881717856