अखेर भाजपात प्रवेश करणार हार्दिक पटेल

    दिनांक : 31-May-2022
Total Views |
काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल नाराजी व्यक्त करत हार्दिक पटेल यांनी राजीनामा दिला होता. यामध्ये त्यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते, तसंच नेतृत्व कामापेक्षा वरिष्ठांची मर्जी जपण्यात, कृती न करता सरकारच्या धोरणावर टीका करण्यातच धन्यता मानतात, असं म्हटलं होतं. अखेर ते लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. या पक्ष प्रवेशाची आता तारीखही जाहीर झालेली आहे.
 
 
hardik
 
 
बऱ्याच दिवसांपासून हार्दिक पटेल यांनी भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र त्याबद्दल अद्याप ठोस माहिती मिळाली नव्हती. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळालेला असून स्वतः हार्दिक पटेल यांनीच या गोष्टीची पुष्टी केली आहे. अखेर २ जून रोजी हार्दिक पटेल भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हार्दिक पटेल यांनी अयोध्येतील राम मंदिर आणि काश्मिरमधून कलम ३७० हटवल्याचा उल्लेख करत भाजपाचं कौतुक केलं होतं. त्यानंतर आता काँग्रेसमधून राजीनामा देत पटेल यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेऊन नव्या राजकीय मार्गाने ते आता वाटचाल करणार आहेत.