चार भारतीयांसह 22 जणांसह बेपत्ता झालेलं दुर्घटनाग्रस्त विमान अखेर सापडलं!

    दिनांक : 30-May-2022
Total Views |
 
नेपाळ : खराब वातावरणामुळे विमान अपघाताच्या घटना वाढत असल्याचं समोर येत आहे. डोंगरांवरून विमान उड्डाण करणं हे दिवसेंदिवस खराब हवामानामुळे जीवघेणं होत असल्याचं दिसत आहे. 4 भारतीयांसह 22 प्रवशांना घेऊन जाणारं विमान अपघातग्रस्त झाल्याची घटना घडली.
 
 

viman
 
 
 
नेपाळमध्ये तारा एअरलाइन्सच्या दुर्घटनाग्रस्त विमानाचे पहिले फोटो सोमवारी समोर आले. मुस्तांग भागातील कोबानमध्ये विमानाचे अवशेष सापडले.
 
या विमानात 4 भारतीय आणि 3 जपानी नागरिकांसह 22 प्रवासी होते. आतापर्यंत या अपघातातील 14 जणांचे मृतदेह सापडले आहेत. विमानातील इतर प्रवाशांबाबत अद्याप काही माहिती समोर आलेली नाही. रविवारी चार भारतीयांसह 22 जणांसह बेपत्ता झालेलं दुर्घटनाग्रस्त विमान सापडलं आहे. नेपाळ लष्कराने विमानाचं अपघातस्थळ शोधलं आहे. नेपाळमधील मुस्तांग भागात हा विमान अपघात झाला आहे. नेपाळमधील मुस्तांग जिल्ह्यातील थासांग-2 येथील सनोसवेअर येथे दुर्घटनाग्रस्त विमानाचे अवशेष सापडलं आहे. लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल नारायण सिलवाल यांनी विमानावर क्रमांक स्पष्टपणे दिसत असलेल्या दुर्घटनाग्रस्त विमानाच्या अवशेषाच्या फोटोसह ट्विट केले आहेत. नेपाळ सैन्याच्या शोध आणि बचाव दलाने विमान अपघात स्थळाचा प्रत्यक्ष शोध घेतला आहे. बचाव दलाकडून सध्या तपास सुरु आहे.
 
या विमानात चार भारतीय नागरिकांसह एकूण 22 जण होते. नेपाळच्या 'तारा एअर'च्या ट्विन ऑटर 9N-AET विमानाने पोखरा येथून सकाळी 09.55 वाजता उड्डाण केलं. विमान कंपनीच्या प्रवक्त्यानं माहिती दिली की, उड्डाणानंतर 15 मिनिटांनी विमानाचा कंट्रोल टॉवरशी संपर्क तुटला. यानंर विमान बेपत्ता झालं. त्यानंतर संपर्क तुटलेल्या भागात मोठा स्फोटासारखा आवाज झाला. नेपाळमध्ये पोखरा ते जोमसोम या ठिकाणी जात असलेल्या बेपत्ता विमानाचे अवशेष सापडले. नेपाळमधील मुस्तांग या ठिकाणी बेपत्ता विमानाचे अवशेष सापडले होते. त्यानंतर आता थासांग-2 येथील सनोसवेअर दुर्घटनाग्रस्त विमान सापडलं आहे.
 
मुंबईतील एकाच कुटुंबातील चार प्रवासी
 
या विमानात चार भारतीय प्रवाशांसोबत एकूण 22 प्रवासी प्रवास करत होते. यामधील चारही भारतीय प्रवासी हे मुंबईतील एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे. अशोक कुमार त्रिपाठी, धनुष त्रिपाठी, रितिका त्रिपाठी आणि वैभवी त्रिपाठी असं या चार भारतीय प्रवाशांची नावं आहेत.