दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून अटक

    दिनांक : 30-May-2022
Total Views |
नवी दिल्ली : दिल्लीचे आरोग्य मंत्री यांना कोलकाता-आधारित कंपनीशी निगडित हवाला व्यवहाराशी संबंधित प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे. सत्येंद्र जैन यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचे हे ईडी प्रकरण ऑगस्ट 2017 मध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाने त्यांच्या आणि इतरांविरुद्ध बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याबद्दल नोंदवलेल्या एफआयआरशी संबंधित आहे.
 

sj 
 
जैन हे दिल्ली सरकारमध्ये आरोग्य, ऊर्जा, गृह, सार्वजनिक बांधकाम विभाग, उद्योग, शहरी विकास, पूर, सिंचन आणि जलमंत्री आहेत. एप्रिल महिन्यात सत्येंद्र जैन यांच्या कुटुंबाची आणि त्यांच्या कंपन्यांची 4.81 कोटी रुपयांची मालमत्ता मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केली होती. 2018 मध्ये, ईडीने या प्रकरणासंदर्भात शकूर बस्ती येथील आपच्या आमदाराची चौकशी केली होती.