'ती' टिपिकल कार्यपद्धती उघड झाली !

    दिनांक : 30-May-2022
Total Views |

'ती' टिपिकल कार्यपद्धती उघड झाली !


प्रहार


महाराष्ट्रातून Maharashtra राज्यसभेसाठी Rajysabha सहा जागांची निवडणूक गाजते आहे. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराजांचे कोल्हापूर गादीचे वंशज संभाजीराजे Sanbhaji Raje यांच्या उमेदवारीमुळे या निवडणुकीची जास्त चर्चा झाली.

 

बरेच दिवस उलटसुलट चर्चेनंतर अखेर संभाजीराजे Sanbhaji Raje यांनी पत्रकार परिषद घेऊन या निवडणुकीत आपण उमेदवारी देणार नसल्याचे जाहीर करून टाकले. मात्र हे करत असताना, त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द मोडल्याची माहिती जाहीर केली. या प्रकरणात अपक्ष म्हणून आपण निवडणूक लढविणार हे जाहीर केल्यानंतर या पत्रकार परिषदेपर्यंत शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांसोबत काय काय घडले तो घटनाक्रम त्यांनी जाहीर केला. संभाजीराजे Sanbhaji Raje यांची ही पत्रकार परिषद ऐकताना २०१९ साली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सरकार स्थापन होईपर्यंत जे डावपेच शिवसेनेने खेळले त्याचीच आठवण झाली. अरेच्चा हीच कार्यपद्धती त्यावेळीही शिवसेना पक्षप्रमुखांनी अवलंबिली होती. बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray यांच्यानंतर शिवसेनेची ही नवी चलाख कार्यपद्धती दिसते आहे असे लक्षात येऊ लागले आहे.

 
 
 
raut

 

 
 
संभाजीराजे Sanbhaji Raje यांंच्यासोबत या राज्यसभा खासदार प्रकरणात महाविकास आघाडीने जणू त्यांचा अवमान करण्याचा चंग बांधल्यासारखा खेळ केला आहे. भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी यांच्या कार्यपद्धतीतील आणि मानसिकतेतील फरक लक्षात आणून देणारे हे प्रकरण आहे. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रपतींकडून नियुक्त केल्या जाणा-या कोट्यातून संभाजीराजे यांना खासदार नियुक्त केले तेव्हा त्यांनी भाजपचे समर्थन करावे किंवा भाजपच्या व्यासपीठावर यावे अशी कसलीही अपेक्षा ठेवली नाही. नंतरच्या सहा वर्षांतही तसा पुसटही प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केला नाही.
 
संभाजीराजे Sanbhaji Raje यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली तरी भाजपने त्यांचा मान ठेवला. अपक्ष निवडणूक लढविणार असे संभाजीराजे Sanbhaji Raje यांनी जाहीर करण्यापूर्वी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. सर्व पक्ष पाठिंबा देत असतील तर आम्हीही हायकमांडकडे तसा प्रस्ताव पाठवू असे त्यांना भाजपकडून आश्वासित करण्यात आले होते. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गेल्या महिनाभरात संभाजीराजेंचा जो खेळखंडोबा केला आहे, तो अवघा महाराष्ट्र पाहतो आहे.
 

संभाजीराजे Sanbhaji Raje यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढविणार असून आपल्याला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर नांदेड येथे शरद पवार Sharad Pawar यांचा दौरा होता. या दौ-यात शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी जाहीर केले की, संभाजीराजे Sanbhaji Raje यांच्या अपक्ष उमेदवारीस महाविकास आघाडीचा पाठिंबा असेल, शिल्लक राहणारी मते सहाव्या जागेसाठी आम्ही संभाजीराजेंना देऊ. पुन्हा मुंबईत जाऊन पवारांनी दुस-या दिवशी अशाच प्रकारचं विधान केलं. इतकंच नव्हे तर भारतीय जनता पक्षाने संभाजीराजे Sanbhaji Raje यांना चांगली वागणूक दिली नाही अशी फोडणीही दिली. ज्या शरद पवारांनी संभाजीराजे Sanbhaji Raje राष्ट्रपती-नियुक्त खासदार झाल्यावर अतिशय खालच्या पातळीवरची जातीय टिप्पणी केली होती, त्यांनी संभाजीराजे यांना कशी वागणूक कोणी दिली हे सांगण्याचा अधिकार गमावला. मात्र शरद पवार असला विधिनिषेध कधीच बाळगत नसतात. फडणवीस मुख्यमंत्री असताना संभाजीराजे Sanbhaji Raje राष्ट्रपती-नियुक्त खासदार झाले तर पवार म्हणाले होते, ''पूर्वी छत्रपती पेशव्यांना नियुक्त करत, आता पेशवे छत्रपतींना नियुक्त करू लागले.'' इतकी कुत्सित आणि जातीय तसेच अवमानकारक प्रतिक्रिया छत्रपतींच्याबाबत कोणीच दिली नसेल.

 

संभाजीराजेंना Sanbhaji Raje पाठिंबा असल्याचे जाहीर केल्यानंतर काही तासांत शरद पवारांनी अगदी सफाईदारपणे टोपी फिरवली. कुंपणावरून पलीकडे उडी मारली. महाविकास आघाडीत आता राज्यसभेची जागा शिवसेनेकडे आहे त्यामुळे शिवसेना जो उमेदवार देईल त्याला आमची शिल्लक मते दिली जातील असे जाहीर केले. संभाजीराजे यांना मते देण्याबाबत केलेले विधान बदलून टाकले. राज्यसभेच्या सहाव्या जागेचा घोळ मग शिवसेनेच्या कोर्टात आला. Sanbhaji Raje मग शिवसेनेची नवी कार्यपद्धती कार्यान्वित होण्यास सुरुवात झाली. शिवसेनेने आधी जाहीर केले की, दोन उमेदवार शिवसेनेचे असतील. त्यामुळे संभाजीराजे Sanbhaji Raje यांना जर राज्यसभेची उमेदवारी हवी असेल तर त्यांनी शिवसेनेचे उमेदवार व्हावे. त्यासाठी त्यांनी शिवबंधन बांधावे. एकदा दिशाभ्रम झाला की परिस्थिती आणि शब्दांचे संदर्भही कसे उलटे होतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. चक्क शिवाजी महाराजांचे नाव घेऊन निघालेला एक राजकीय पक्ष शिवसेना हा शिवछत्रपतींच्या गादीचा वारस असलेल्या संभाजीराजेंना 'शिव'बंधन बांधायला सांगतोय असे हे चित्र होते.

 

संभाजीराजे Sanbhaji Raje यांनी आपण ही निवडणूक अपक्ष म्हणूनच लढविणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर त्यांच्या शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा झाल्या. मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटीसाठी बोलावले. संभाजीराजे Sanbhaji Raje म्हणतात की, त्या चर्चेअंती मुख्यमंत्र्यांनी असे सांगितले की, महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार आम्ही तुम्हाला करू शकतो. त्यानंतर या चर्चेच्या आधारावर मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी आणि संभाजीराजे Sanbhaji Raje यांनी एक मसुदा तयार केला. मंत्र्यांच्या अक्षरात हा हस्तलिखित मसुदा राजे यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या मोबाईलमध्येही उपलब्ध आहे. मात्र त्यानंतर ते कोल्हापूरला जाईपर्यंत वेगळ्याच बातम्या सुरू झाल्या. संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करणार, वर्षावर शिवबधन बांधणार अशा बातम्या सुरू झाल्या. राजे म्हणतात की, कोल्हापूरला पोहोचेपर्यंत शिवसेनेने संजय पवार यांना उमेदवारी दिल्याचेही जाहीर झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना अनेकदा फोन लावला, मात्र त्यांनी फोन उचलला नाही. अखेर संभाजीराजे Sanbhaji Raje यांनी निवडणुकीत उमेदवारी न देण्याचा निर्णय जाहीर केला. शिवसेनेचे प्रवक्ते मात्र याबाबत काहीही प्रश्न विचारला की 'आमच्या दृष्टीने तो विषय संपला' असे सांगत उत्तरे देण्याचे टाळत आहेत. नाहीतर भारतीय जनता पक्षावरच ठरलेले वैफल्य, विरोधासाठी विरोध वगैरे आरोप करत विषयांतर करत आहेत.

 

यावरून शिवसेनेची नवी कार्यपद्धती पुन्हा एकदा समोर आली आहे. शिवसेनेचा तात्कालिक फायद्याचा एक अजेंडा आधी ठरलेला असतो. तो सरळ सरळ जाहीर न करता लोकभावनेचा विचार करत आधी त्यातील समोरच्या गटाला अंधारात ठेवत चर्चेचा देखावा केला जातो. समोरच्या गटाला त्यात गाफील ठेवून फायद्याचा अजेंडा अचानक पुढे केला जातो. त्यानंतर समोरच्या गटाशी थेट संपर्क ठेवायचाच नाही. फोन उचलायचा नाही. जो संवाद असेल तो माध्यमांमधूनच करायचा. खिंडीत गाठल्यासारखे समोरचा गट नामोहरम होऊन, अवमानित होऊन गप्प बसला पाहिजे अशी ही कार्यपद्धती आहे. सरकार बनवण्याच्या वेळी कोणीही साक्षीदार नसलेल्या बंद खोलीतील तथाकथित कराराचा आधार घेतला गेला. शिवसेनाप्रमुखांना दिलेल्या त्या कथाकथित वचनाचा भावनिक आधार घेतला गेला. या दोन आधारांचा वापर करत थेट हिंदुत्वाच्या उलटा यू टर्न मारत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी महाविकास आघाडी करून सत्ता स्थापन केली गेली. देवेंद्र फडणवीस यांचा एकही फोन उद्धव ठाकरे यांनी उचलला नाही.

 

आता संभाजीराजे Sanbhaji Raje यांच्या उमेदवारीबाबत तेच घडले. शिवसेनेचाच उमेदवार असेल असा नियम तयार केला गेला. या नियमात राजेंना बांधण्याचा प्रयत्न झाला. त्यांना चर्चेत ठेवून दुसरा उमेदवार जाहीर केला गेला. राजेंचे फोन न उचलून थेट संपर्काचा मार्ग बंद करण्यात आला. आता 'आम्हाला छत्रपतींच्या वंशजांबाबत Sanbhaji Raje आदर आहे.' 'आम्ही त्यांना आदराने शिवसेनेचे उमेदवार व्हा असे आमंत्रण दिले होते', अशी वाक्ये प्रवक्त्यांकडून वारंवार म्हटली जात आहेत. महाराष्ट्रात सरकार स्थापन करतानाही सेनेकडून अशीच कार्यपद्धती अवलंबिली होती. तीच आताही वापरण्यात आली. महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या जनादेशाला अगदी उलट्या दिशेने वळण कसे दिले गेले त्याचे दुवे या निमित्ताने पुन्हा उघड झाले आहेत. राजकीय नेते आणि राजकीय पक्ष नेहमीच जनतेला अडाणी आणि बावळट समजत आपले डावपेच खेळत असतात. Sanbhaji Raje एखादा तात्त्विक मुलामा दिला की आपण राजकारणात कोणतीही भूमिका घेतली तरी जनतेला काही कळत नाही अशी एक समजूत नेत्यांची होती. त्यामुळे कधी 'एकाधिकारशाहीला विरोध करण्यासाठी मी पक्ष सोडत आहे', असे म्हणायचे तर कधी 'घर जळत असताना मी संन्यास घेऊन दूर बसू शकत नाही' असे म्हणत पदावर आरूढ व्हायचे. कधी सर्वधर्मसमभावाचे तुणतुणे वाजवायचे तर कधी प्रादेशिक अस्मितेचा शंख करायचा.

 

जोपर्यंत इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया नव्हते Sanbhaji Raje तोपर्यंत राजकीय पक्ष आणि नेत्यांचे असले चलाखीचे खेळ चालत होते. जनतेला फारसे कळत नसे. मात्र आता सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे माहिती शेवटच्या स्तरापर्यंत लगेच पोहोचते. प्रत्येकाच्या मनात त्या माहितीची प्रतिक्रिया उमटते. मोठ्या प्रमाणावर लोकांचे प्रशिक्षण आपोआप होत आले आहे. तुलनात्मक, विश्लेषणात्मक विचार लोक करू लागले आहेत. इतक्या वेगाने ही प्रक्रिया गेल्या काही वर्षांत घडली आहे की त्याचा अंदाज माध्यमांनाही आलेला नाही. Sanbhaji Raje त्यामुळे अनेकांचे निवडणूकपूर्व अंदाज, मतदानोत्तर चाचणी असे प्रकार फसत चालले आहेत. या जागरूक मतदारांच्या जमान्यात राजकीय पक्षांचे हातचलाखीचे खेळ लगेच जनतेच्या लक्षात येतात. शिवसेनेने विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर युती तोडून मुख्यमंत्रिपद मिळविण्यासाठी केलेले डावपेच आणि आता संभाजीराजे यांना डावलताना केलेले डावपेच लगेच लक्षात येणारे आहेत. Sanbhaji Raje योग्यवेळी त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटू शकते. आपण विरोधकांना मुत्सद्देगिरीने कसे नामोहरम केले याचे समाधान फार काळ टिकणारे नसते हे लक्षात घेतले पाहिजे.

 
- दिलीप धारूरकर