अबोली प्रकाश एदलाबादकर यांना रसायनशास्त्रात पीएच डी प्रदान

    दिनांक : 29-May-2022
Total Views |
नागपूर : जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या तिसाव्या दीक्षांत समारंभात अबोली अतुल शिरखेडकर (पूर्वाश्रमीच्या अबोली प्रकाश एदलाबादकर ) यांना रसायनशास्त्र विषयात पीएच.डी. प्रदान करण्यात आली.
 
 
aboli
 
 
‘डेव्हलपमेंट ऑफ अनलिटिकल मेथड्स अँड व्हॅलिडिटेशन स्टडीज ऑन फ्यू ऍक्टिव्ह मेडिकॉमेंट्स इन फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन’ हा त्यांचा शोधप्रबंधाचाचा विषय होता. नाशिक येथील के.के. वाघ विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.पी.राजपूत हे त्यांचे मार्गदर्शक होते. डॉ. अबोली यांनी विविध सॉफिस्टिकेटेड इंस्ट्रुमेंट्सचा वापर करून विविध औषधांसाठी नवीन अनॅलिटीकल मेथड्स विकसित केल्या आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून तसेच वैज्ञानिक नियतकालिकांमधून त्यांचे १० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झालेे आहेत.
 
अबोली यांचे पती डॉ. अतुल अरुण शिरखेडकर (उपप्राचार्य, आर.सी.पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च ,शिरपूर ,जि .धुळे) आणि कुटुंबियांचे त्यांना सहकार्य लाभले. शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री आ.अमरीशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी तसेच डॉ.के.बी.पाटील (माजी कुलगुरू ), डॉ.एस.जे.सुराणा, डॉ.पंजाबराव पवार प्रभृतींनी डॉ. अबोली यांचे अभिनंदन केले आहे.