‘या’ राज्यात वीज पडून ३३ जणांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दु:ख

    दिनांक : 28-May-2022
Total Views |
दिल्ली : बिहार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला असून काही जिल्ह्यांमध्ये वीजादेखील कोसळल्या आहेत. या विजेच्या तडाख्यात आतापर्यंत ३३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. मुसळधार पावसानंतर बिहारमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
 
light 
 
 
या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी झालेल्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. ईश्वर मृतांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, असे ट्वीट नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तसेच राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन मदत आणि बचाव कार्य करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
 
बिहारमध्ये गुरुवारी तीव्र स्वरूपाचा वादळी पावसासोबत भागलपूर, मुझफ्फरपूर, सारणम, लखीसराय, मुंगेर, समस्तीपूर, जेहानाबाद, खगरिया, नालंदा, पूर्णिया, बांका, बेगुसराय, अररिया, जमुई, कटिहार, दरभंगा आदी जिल्ह्यांमध्ये वीजा पडून सुमारे ३३ जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. या नैसर्गिक आपत्तीच्या संकटात आपण पीडित कुटुंबांसोबत असल्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले.