पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंडिया ड्रोन फेस्टिव्हल 2022 चे उद्घाटन

    दिनांक : 27-May-2022
Total Views |
 
 
नवी दिल्ली :  दिल्लीतील प्रगती मैदानावर देशातील सर्वात मोठ्या ड्रोन महोत्सवाचे Drone Festival आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडिया ड्रोन फेस्टिव्हल 2022 चे उद्घाटन केले. पीएम मोदींनी ड्रोन प्रदर्शन पाहिले. यावेळी त्यांनी उपस्थित लोकांना संबोधित केले. ते म्हणाले की, या तंत्रज्ञानाबाबत जो उत्साह आज दिसत आहे तो खूपच आश्चर्यकारक आहे. पंतप्रधान म्हणाले की, यापूर्वी तंत्रज्ञानाची भीती दाखवली जात होती, पण ते लोकांपर्यंत नेण्याचे काम आम्ही केले. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, मी केदारनाथ विकास प्रकल्पावर ड्रोनने लक्ष ठेवले असून या तंत्रज्ञानामुळे लाखो शेतकऱ्यांना मदत होणार आहे. पूर्वीच्या सरकारांच्या काळात तंत्रज्ञान हा समस्येचा भाग मानला जात होता, त्याला गरीबविरोधी म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यामुळे 2014 पूर्वीच्या कारभारात तंत्रज्ञानाच्या वापराबाबत उदासीनतेचे वातावरण होते.मात्र यात सर्वात जास्त नुकसान गरीब, वंचित, मध्यमवर्गीयांचे झाले.
 

modiji1 
 
 
 
दोन दिवस चालणार ड्रोन फेस्टिव्हलमध्ये Drone Festival सरकारी, खासगी कंपन्या आणि ड्रोन स्टार्टअपचे 1600 हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. 27 ते 28 मे दरम्यान ड्रोन फेस्टिव्हल होणार आहे. उद्घाटनापूर्वी पंतप्रधानांनी शेतकरी ड्रोन ऑपरेटरशी संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी 150 ड्रोन पायलट प्रमाणपत्रे डिजिटली लॉन्च केली. या महोत्सवात सरकारी अधिकारी, विदेशी मुत्सद्दी, सशस्त्र दलांचे प्रतिनिधी, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल सहभागी होत आहेतपीएमओकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान उघड्यावर ड्रोनचे प्रात्यक्षिक पाहतील आणि ड्रोन कंपन्या आणि स्टार्टअपशी संवाद साधतील. या उत्सवादरम्यान पंतप्रधान ड्रोन उडवताना दिसणार आहेत. ड्रोन वापरण्याचे 70 हून अधिक मार्ग प्रदर्शनात दाखवले जाणार आहेत. हे मेड इन इंडिया ड्रोन टॅक्सी प्रोटोटाइप देखील प्रदर्शित करेल. महोत्सवादरम्यान उत्पादनांचे लाँचिंगही होणार आहे.