..आणि म्हणे आम्ही पुरोगामी!

    दिनांक : 26-May-2022
Total Views |


वेध


अभिव्यक्ती स्वातंत्र्य Sharad Pawar प्रत्येकालाच आहे; मात्र त्याचा दुरुपयोग कुणालाही करण्याचा अधिकार नाही.

आपली मते मांडा, मात्र कुणावर टीका करताना भान ठेवायला पाहिजे, हे सर्व मान्यच आहे. एखाद्याने चूक केली तर त्याचा महाराष्ट्र सरकार कसा मानसिक छळ करतात, हे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे. एखाद्याला चुकीची शिक्षा देणे यात काहीच गैर नाही. पण त्याला कायद्याच्या कचाट्यात ओढून आयुष्य उद्ध्वस्त होईपर्यंत त्याचा मानसिक छळ जर सरकारकडूनच होत असेल तर हे मात्र नक्कीच चुकीचे आहे. केतकी चितळे प्रकरणात सध्या राज्य सरकारकडून तेच सुरू आहे. तिच्यावर विविध ठिकाणी गुन्हे दाखल करून तिचा मानसिक छळ केला जात आहे. तिला तिच्या चुकीची शिक्षा देणे इथपर्यंत ठीक आहे; पण तिचा मानसिक छळ जर होत असेल तर स्वत:ला पुरोगामी म्हणविणार्‍या पवारांसाठी Sharad Pawar लाजिरवाणी बाब आहे. तिने ही पोस्ट शेअर केली तशीच पोस्ट अनेकांनी शेअर केली आहे. मात्र, त्या सर्वांवर गुन्हे दाखल न करता एकट्या केतकी चितळेवरच विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 
 

sharad pawar 

 

 
 
 
मुख्य म्हणजे या संदर्भात पवारांची Sharad Pawar कुठलीही तक्रार नसताना. या उलट परिस्थिती उत्तरप्रदेशात एका प्रकरणात दिसून आली. उत्तरप्रदेशातील एका मुलाने मुख्यमंत्री योगी यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली. त्यामुळे त्याला तिथल्या प्रशासनाने शिक्षा केली. मात्र, या शिक्षेमुळे त्या मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त होणार नसून ती शिक्षा त्या मुलाच्या मनावर योग्य परिणाम करणारी आहे. योगींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यामुळे त्या मुलाला 15 दिवस गोशाळा स्वच्छ करण्याची शिक्षा तिथल्या प्रशासनाने दिली आहे. या शिक्षेमुळे त्या मुलाच्या आयुष्याचे नुकसान होणार नसून केवळ त्याला त्याची चूक लक्षात आणून देणारी शिक्षा ठोठाविण्यात आली आहे. याउलट परिस्थिती आपल्या राज्य सरकारची असून एखाद्याला कायद्याच्या कचाट्यात ओढून त्याचा मानसिक छळ Sharad Pawar कसा करता येईल, हेच या सरकारची पिलावळं बघत आहे. राणा दाम्पत्य असो की केतकी चितळे; ही दोन्ही उदाहरणे बोलकी आहेत.
 

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे किंवा शरद पवार Sharad Pawar यांच्यासारख्या सत्ताधार्‍यांविरोधात काही लिहिले, बोलले की कायद्याच्या कचाट्यात ओढून संबंधित आरोपीचा मानसिक छळ केला जातो आणि त्याची ससेहोलपट केली जाते. राणा दाम्पत्याच्या प्रकरणातही सरकारने गुन्हे नोंदवून त्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकविले तर केतकी चितळे हिने पवारांविरोधात पोस्ट शेअर केल्यामुळे तिच्यावर विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका ठिकाणच्या गुन्ह्यातून जामीन मिळाल्यानंतर लगेच दुसर्‍या ठिकाणचे पोलिस ताब्यात घेण्यासाठी तयार आहेत. तिने चूक केली असल्यास एका ठिकाणी गुन्हा नोंदवून तिला जी शिक्षा द्यायची ती द्यायला काहीच हरकत नव्हती. मात्र, तिच्यावर एखाद्या आतंकवाद्याप्रमाणे विविध ठिकाणी गुन्हे दाखल करून तिचा जो मानसिक छळ प्रशासनाकडून चालविला जात आहे; तो निश्चितच चुकीचा वाटतो. मु'यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यावर आपल्या जाहीर सभांतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे कितीतरी आक्षेपार्ह विधाने करतात. अतिशय शिवराळ Sharad Pawar भाषेत त्यांचा समाचार घेतात. मात्र, त्यांना अटक करण्याची हिंमत सरकारच्या पिलावळांमध्ये आणि सरकारमध्येही दिसून आली नाही.

 

केवळ सर्वसामान्य नागरिकांचीच मुस्कटदाबी ठाकरे सरकारला करायची आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उभा ठाकला आहे. उत्तरप्रदेश सरकारने मुख्यमंत्री योगी यांच्याविरोधात Sharad Pawar आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणार्‍या मुलाला 15 दिवस गोशाळा स्वच्छ करण्याची शिक्षा दिली आहे तर या उलट परिस्थिती ठाकरे सरकारने महाराष्ट्रावर आणून महाराष्ट्राची जणू वाईट अवस्था केली आहे, असे म्हटल्यास वाईट वाटून घेऊ नये. गुन्हेगाराला शिक्षा करणे हे प्रशासनाचे कामच आहे.

 
मात्र, अट्टल गुन्हेगार नसतानाही एखादी पोस्ट शेअर केल्याबद्दल केतकी चितळेसारख्या मुलीला कायद्याच्या कचाट्यात ओढून तिच्यावर विविध ठाण्यांत गुन्हे दाखल करणे इतकी नामुष्की सरकारवर आली आहे का? राज्यात कितीतरी गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. जर खरंच हिंमत असेल तर त्यांना कायद्याच्या कचाट्यात ओढा आणि जेरबंद करा. चितळे, राणा यांच्यासार'यांना तुरुंगात डांबून नक्कीच मोठेपणा मिरविण्याची गरज नाही.
 
- नंदकिशोर काथवटे 
 

- 9922999588