सेनापती पदाबाबत फेरविचार!

    दिनांक : 23-May-2022
Total Views |


8 डिसेंबर 2021 रोजी देशाचे पहिले post of commander सेनापती जनरल बिपीन रावत यांचे एका अपघातात निधन झाल्यानंतर काही दिवसात नव्या सेनापतींची नियुक्ती केली जाईल, असे अपेक्षित होते.

 
 
 
image

 

 
 
मात्र, पाच महिन्यांचा अवधी उलटून गेल्यानंतरही ही नियुक्ती न झाल्याने या पदाबाबत सरकारने फेरविचार सुरू केला आहे, असे मानले जात आहे. सेनापती म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद अमेरिकेत आहे. तेथे सर्व सेनादलांसाठी एकच प्रमुख आहे. या धर्तीवर भारतातही ही व्यवस्था लागू करण्यात यावी, असा एक विचार वाजपेयी सरकार असताना झाला होता; त्यानुसार सध्याच्या केंद्र सरकारने 2019 मध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे सेनापती हे पद तयार केले. विशेष म्हणजे तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांचे अधिकार कायम ठेवून ते निर्माण करण्यात आले होते. या पदामुळे एक नवा लष्करी विभाग तयार करण्यात आला. राष्ट्रपती व पंतप्रधान यांना लष्करी सल्ला देण्याची जबाबदारी नव्या post of commander सेनापतींकडे राहणार होती. म्हणजे तिन्ही सेनाप्रमुखांनी सेनापतींना लष्करी हालचालींची माहिती द्यावी आणि नंतर त्यांनी राष्ट्रपती व पंतप्रधान यांना ती द्यावी, अशी रचना तयार करण्यात आली होती.
 

सेनादलांचे एकीकरण

 

थलसेना, वायुसेना, नौसेना या तिन्ही post of commander सेनादलांचे स्वतंत्र अस्तित्व तर राहील; मात्र सैन्य कारवाईसाठी उत्तर, दक्षिण, पूर्वोत्तर भागासाठी स्वतंत्र अशी व्यवस्था तयार करण्याचे 'इंटेग्रेटेड कमांड' तयार करण्याचे एक ध्येय समोर ठेवून स्व. जनरल रावत त्यावर काम करीत होते. आता सरकारने या सार्‍याच रचनेचा फेरविचार करण्याचे ठरविले असल्यासारखे दिसते. भारतात अमेरिकेच्या धर्तीवर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद निर्माण करण्यात आले असले, तरी भारताची स्थिती अमेरिकेपेक्षा फार वेगळी आहे. भारतात लष्कराला सर्वात महत्त्वाचे स्थान आहे. त्यानंतर वायुदल व शेवटी नौदल असा क्रम तयार होतो. अमेरिकेत नौदल सर्वात प्रभावी व महत्त्वाचे मानले गेले. अमेरिकेची ताकद आहे त्याच्या नौदलात! सार्‍या जगावर टेहळणी व नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकेने मोठ्या प्रमाणावर विमानवाहू युद्धनौका, पाणबुड्या यांचे ताफे विकसित केले आहेत. विमानवाहू नौकांवर विमानांचे ताफे ठेवण्यात आले आहेत. गॅलेक्सी, ग्लोबमास्टर व हर्क्युलस ही अवजड मालवाहू विमाने वगळता बहुतेक लढावू विमाने युद्धनौकांवर तैनात आहे. अशा स्थितीत तेथील लष्करप्रमुखांची स्थिती काय असणार? या सार्‍याचा विचार करून तेथे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद तयार करण्यात आले. अगदी ओसामा बिन लादेनला ठार मारण्यासाठी पाठविण्यात आलेले पथकही अमेरिकन नौदलाचे होते. भारतात ही स्थिती नाही. भारतात लष्कर सर्वात महत्त्वाचे आहे. भारतासारख्या देशात सेनाप्रमुख, वायुदल प्रमुख व नौदल प्रमुख ही रचनाच प्रभावी असल्याचे मानले जाते. या तिन्ही प्रमुखांची एक समिती आहे आणि सर्वात ज्येष्ठ असलेला अधिकारी या समितीचा अध्यक्ष असतो. यात तिन्ही post of commander प्रमुखांना समितीचा अध्यक्ष होण्याची संधी मिळते. शेवटी हे पदही चीफ ऑफ डिफेन्स स्टाफसारखेच असते. शेवटी या रचनेवरच भारताने 1965, 71 व 99 या तिन्ही लढाया जिंकल्या आहेत.

 

फक्त व्यवस्थापक?

 

भारतात जी नवी लष्करी रचना तयार केली जाणार होती; त्यात post of commander लष्कर प्रमुख, वायुदल प्रमुख व नौदल प्रमुख यांची स्थिती त्यांच्या त्यांच्या सेनादलाचे 'व्यवस्थापक' अशी राहणार होती. उदाहरणार्थ सेनादलाची भरती, प्रशिक्षण, त्यांचा सराव या सार्‍या बाबी लष्कर प्रमुख पाहणार. अशीच व्यवस्था वायुदल व नौदलासाठी राहणार होती आणि युद्धाचे संचालन करण्याची जबाबदारी मात्र फक्त चीफ ऑफ डिफेन्स स्टाफकडे राहणार होती. ही व्यवस्था भारतासाठी योग्य राहील काय, याचा फेरविचार सरकारने केला असल्याचे समजते. त्याचप्रमाणे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचे पद तिन्ही दलांच्या प्रमुखांसाठी खुले राहणार होते. म्हणजे, वायुदल प्रमुख, नौदल प्रमुखही चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होऊ शकतात. पण, भारतासाठी पाकिस्तान-चीन या सीमा सर्वात महत्त्वाच्या व संवेदनशील आहेत. वायुदल प्रमुख, नौदल प्रमुखांना तर याची काहीही माहिती नाही. मग, ते आपली जबाबदारी कशी हाताळणार? त्याचप्रमाणे इंटेग्रेटेड कमांडची कल्पना कागदावर ठीक आहे. पण, भारतात ती राबविणे शक्य नाही, सोपे नाही असे काही तज्ज्ञांना वाटते. या सार्‍याचा आढावा घेतल्यानंतर सरकार नवे post of commander सेनापती नियुक्त करण्यास फार उत्सुक नाही, असे मानले जाते.

 

किसिंजर नाबाद 99

 

जगाचा विश्वकोश म्हणता येईल असे अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री डॉ. हेन्री किसिंजर आज 100 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. पाच दिवसांपूर्वी डॉ. किसिंजर यांची एक मुलाखत घेण्यात आली. विषय होता- युक्रेन, अमेरिका, रशिया आणि चीन! मुलाखत घेणार्‍या पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना, ज्याप्रकारे डॉ. किसिंजर सार्‍या घटनाक्रमाचे विश्लेषण करीत होते; ते आश्चर्यकारक होते. वयाची 99 वर्षे पूर्ण करणार्‍या या नेत्याची बुद्धिमत्ता-स्मरणशक्ती एवढी तीक्ष्ण कशी, असा प्रश्न ही मुलाखत पाहताना वाटत होते. किसिंजर सांगत होते, मी राष्ट्रपती पुतिन यांना 20-25 वेळा भेटलो आहे, पण आंतरराष्ट्रीय राजकारणाचा एक विद्यार्थी म्हणून, एक अभ्यासक म्हणून. पुतिन यांच्या डोक्यात भव्य-दिव्य रशियाचे स्वप्न होते हे मला जाणवत होते. त्या स्वप्नपूर्तीच्या नादात त्यांनी स्वत:ला, post of commander रशियाला व जगाला गंभीर अडचणीत आणून ठेवले आहे, असे विश्लेषण डॉ. किसिंजर यांनी केले आहे.

 

अमेरिकेला सल्ला

 

डॉ. किसिंजर यांनी मांडलेला दुसरा मुद्दा म्हणजे, अमेरिका व युरोपने रशिया व चीन अधिक जवळ येतील, असे काही करू नये. अमेरिका-चीन यांच्यात संबंध स्थापित करण्याचे डॉ. किसिंजर शिल्पकार मानले जातात. रशिया व चीन यांच्यात काही मतभेद आहेत. ते समोर येणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही देश परस्परांच्या अधिक जवळ येतील, असे अमेरिकेने काहीही करता कामा नये. राष्ट्रपती पुतिन यांनी स्वत:ला ज्या स्थितीत आणून ठेवले आहे, चिनी नेते त्या स्थितीत स्वत:ला आणून ठेवणार नाहीत. कारण ते फार हुशार आहेत, असेही post of commander किसिंजर यांनी या मुलाखतीत म्हटले आहे.

अमेरिका व चीन दोन्ही देश तुल्यबळ आहेत. यांच्यातील संघर्षात एका देशाचा विजय होणे म्हणजे मानवजात धोक्यात येण्याची स्थिती उद्भवणे, हे आपण पक्के लक्षात ठेवले पाहिजे, असे त्यांचे post of commander प्रतिपादन होते.

 
आंतरराष्ट्रीय जगतात डॉ. किसिंजर हे एक फार मोठे नाव होते. जगात कुठेही पेचप्रसंग निर्माण झाला की, किसिंजर तेथे असणार! ते जन्माने अमेरिकन नाहीत आणि अमेरिकन घटनेनुसार फक्त अमेरिकेत जन्म झालेली व्यक्तीच त्या देशाची राष्ट्रपती होऊ शकते. या एका कारणामुळे ते अमेरिकेचे राष्ट्रपती होऊ शकले नाहीत. एकदा एका पत्रकाराने त्यांना विचारले होते, अमुक अमुक देशांमध्ये लवकरच एक पेचप्रसंग तयार होत आहे, असे आपल्याला वाटत नाही काय? डॉ. किसिंजर यांचे मिश्कील असे उत्तर होते, आगामी आठवड्यात कोणताही नवा post of commander पेचप्रसंग तयार होणार नाही. कारण, पेचप्रसंग सोडविण्याचे माझे आठवडाभराचे कार्यक्रम निश्चित झाले आहेत.
 
- रवींद्र दाणी