इम्रान खानच्या तोंडून भारताचं कौतुक ऐकून संतापल्या मरियम नवाज

    दिनांक : 22-May-2022
Total Views |
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्वीट करत दक्षिण आशिया निर्देशांकाच्या अहवालाला टॅग केले आहे. ज्यात म्हटले आहे की, रशियाकडून अनुदानित तेल खरेदी केल्यानंतर भारत सरकारने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 9.5 रुपये, डिझेलच्या दरात 7 रुपयांनी कपात केली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताच्या रशियाकडून कमी दरात तेल खरेदी करण्याच्या धोरणाचं कौतुक केलं आहे.
 

int 
 
भारताने अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता जनतेला दिलासा देण्यासाठी सवलतीच्या दरात रशियन तेल खरेदी केले. पाकिस्तानमध्ये आमचे सरकार असताना आम्ही स्वतंत्र परराष्ट्र धोरणाच्या मदतीने जनतेला इंधन दरावरील किंमतीत दिलासा देणार होतो, असं इम्रान खान म्हणाले. 
 
मीर जाफर आणि मीर सादिक यांनी पाकिस्तानमध्ये सत्ताबदल घडवून आणण्यासाठी बाह्य दबावापुढे झुकल्याची कडाडून टीका इम्रान खान यांनी सध्याच्या पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) नेतृत्वाखालील सरकारवर केली असून मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाची त्यांनी स्तुती केल्याने पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाजच्या उपाध्यक्षा मरियम नवाज यांनी इम्रान खान यांना खडेबोल सुनावले आहे.