सायबर गुन्हेगारीस आळा घालण्यास ट्रायचा पुढाकार

    दिनांक : 21-May-2022
Total Views |
नवी दिल्ली : वाढती सायबर गुन्हेगारी रोखण्यास सध्या ट्राय नव्या यंत्र प्रणालीवर काम करत आहे. स्पॅम कॉल्सचा धोका संपुष्टात आणण्यासाठी फोन नंबर ओळखणं अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे फोन स्क्रीनवर कॉलरचं केवायसीवर आधारित नाव फ्लॅश व्हावं, यासाठी महत्त्वाची यंत्रणा भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्रायचे) प्रयत्न सुरु आहेत. 'लवकरच याबाबत काम सुरू होईल.
 

try 
 
'केवीयसी'वर आधारित कॉलर आयडेंटिफिकेशन यंत्रणेमुळे  यूजर्सचं स्पॅम कॉल आणि फसवणुकीच्या वाढत्या घटनांपासून संरक्षण होऊ शकेल,' असं तज्ज्ञांनी ट्रायला सांगितलं आहे. दरम्यान, ईमेल स्टेटमेंटच्या माध्यमातून ट्रु-कॉलर या कॉलर आयडेंटिफिकेशन अ‍ॅपच्या प्रवक्यानं या उपक्रमाचं स्वागत क्ेलं आहे.
 
ही यंत्रणा काम करू लागल्यानंतर या नव्या यंत्रणेच्या माध्यमातून फोनच्या स्क्रीनवर कॉलरचं नाव दिसेल. जर कॉलरचं नाव दर्शवणारी ही यंत्रणा सुरू झाली तर संपूर्ण कॉलिंग नेटवर्कमध्ये अधिक मजबूत होईल. सध्या ट्रायनं उचललेलं हे पाऊल शिफारशीच्या टप्प्यावर असल्यानं, ही यंत्रणा नेमकी केव्हा विकसित होऊन वास्तवात येणार हे अद्याप अस्पष्ट आहे.