उद्या पुण्यात राज ठाकरेंची सभा

    दिनांक : 21-May-2022
Total Views |
पुणे : उद्या पुण्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेचं सकाळी 10 वाजता गणेश कला क्रिडा सभागृहात आयोजन करण्यात आलं आहे. या सभेस परवानगी मिळाली आहे. मात्र काही अटी-शर्थी ठेवण्यात आल्या असल्याने नियमांचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.
 
 RT
 
या आहेत अटी :-
(1) सदर सभा ही 22-05-2022 रोजी सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंतच्या कालावधीत आयोजित करण्यात आली असून कार्यक्रम स्थळ आणि वेळेत बदल करू नये.
(2) सभेत सहभागी होणाऱ्या वक्त्यांनी भाषण करताना दोन समाजामध्ये धार्मिक, जातीय तेढ निर्माण होणार नाही, तसेच विशिष्ट समाजाच्या व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावणार नाही याची काळजी घ्यावी.
(3) सभेदरम्यान कोणत्याही व्यक्तीचा किंवा समुदायाचा वंश, जात, भाषा, प्रदेश, जन्मस्थळ किंवा ते पाळत असलेल्या रूढी परंपरांचा अपमान होणार नाही किंवा त्यांना चिथावणी दिली जाणार नाही याची काळजी घ्यावी.
(४) सभेत सामील होणारे कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक यांनी स्वयंशिस्त पाळावी, तसेच सभास्थळी वेगवेगळ्या भागातून येताना किंवा जाताना इतर धर्म/जात/पंथ यावर टीका-टीप्पणी तसेच कार्यक्रमस्थळी हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करणार नाहीत. तसेच सभेच्या दरम्यान कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य, खाणाखुणा तसेच निशाणा दाखविणार नाहीत.
(५) कार्यक्रमादरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटकं पदार्थ बाळगू नये किंवा प्रदर्शन करू नये. शस्त्र अधिनियमातील कायदेशीर तरतूदींचं उल्लंघन होणार नाहीत, याची काळजी घेतील.