आसाममध्ये पूरस्थिती अतितीव्र

    दिनांक : 20-May-2022
Total Views |
आसाम : सद्य स्थितीत राज्यात निर्माण झालेल्या पुराने 7,17, 500 हून अधिक लोक बाधित झाल्याचं प्राधिकरणाने म्हटलं आहे. बजली, बक्सा, बारपेटा, विश्वनाथ, बोनगाईगाव, कछार, दरांग, धेमाजी, धुबरी, दिब्रुगड, दिमा हसाओ, गोलपारा, हैलाकांडी, होजई, कामरूप, कामरूप मेट्रोपॉलिटन, कार्बी आंगलाँग वेस्ट, करीमगंज, कोकराझार, लखीमपूर, माजुली, मोरीगाव, नागाव, नलबाडी, सोनितपूर आणि उदलगुरी जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे.
 
 
 flo
 
 
सर्वत्र पुराने थैमान घातले असून गुरुवारी पूरस्थिती अतितीव्र झालेली आहे 27 जिल्हे आणि जवळपास 7.18 लाख लोक पुराच्या तडाख्यात अडकले आहेत. नागाव जिल्ह्यातील कामपूर महसूल क्षेत्रात बुडून एकाचा मृत्यू झाला असून कामपूरमध्ये आणखी दोन जण बेपत्ता आहेत. यासह राज्यात पूर आणि भूस्खलनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या दहावर गेलेली आहे.
 
लष्कर, निमलष्करी दल, NDRF, SDRF, नागरी प्रशासन, प्रशिक्षित स्वयंसेवक, अग्निशमन, आपत्कालीन सेवा आणि स्थानिक लोकांनी 7,334 लोकांना विविध पूरग्रस्त भागातून बाहेर काढण्यासाठी बोटी आणि हेलिकॉप्टरचा वापर केला. अधिकाऱ्यांनी 7,077.56 क्विंटल तांदूळ, डाळी आणि मीठ, 6,020.90 लीटर मोहरीचे तेल, 2,218.28 क्विंटल चारा आणि इतर पूर मदत सामग्रीचे वाटप केलं आहे.