ज्ञानवापी मशिदीचा खटला जिल्हा न्यायालयाकडे वर्ग ; या प्रकरणाची सुनावणी २३ मे रोजी

    दिनांक : 20-May-2022
Total Views |
मुंबई : कथित शिवलिंग परिसराची सुरक्षा करा, नमाज पठणात कोणतीही बाधा नको, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज (मे २० ) पार पडलेल्या सुनावणीत म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीचे प्रकरण जिल्हा न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणाची सुनावणी २३ मे रोजी जिल्हा न्यायालयात होणार आहे. पुढील आठ आठवड्यापर्यंत हे सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश लागू असतील असे त्यांनी म्हटले.
 
court
 
 
 
 
वाराणसी न्यायालयाच्या निर्णयाला अवैध घोषित करा, अशी मागणी मुस्लिम पक्षकारांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत केली होती. कारण, वाराणसी न्यायालयाचा निर्णय हा वातावरण खराब करणार आहे, असे मशिद कमिटीचे म्हणणे आहे
.
जिल्हा न्यायाधीश हे अनुभवी आहे. त्यामुळे या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करणे योग्य ठरणार नाही, असे निरिक्षण सर्वोच्च न्यायालयाने आज पार पडलेल्या सुनावणीत म्हटले आहे. गेल्या ५०० वर्षापासून असलेले धार्मिक पद्धतमध्ये बदल करण्याचा आरोप मुस्लिम पक्षकारांनी न्यायालयात केला आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती वी.आय. चंद्रचूड, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि पी. एस. नरसिंहा यांच्या खंडपीठासमोर झाली.
 
सर्वोच्च न्यायालयाने ५ मिनिटात कामकाज संपवले होते. न्यायालयाने काल (१९ मे) पार पडलेल्या होती. यात हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांचे सहकारी ज्येष्ठ वकील हरिशंकर जैन यांची प्रकृती ठीक नसल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर न्यायमुर्ती चंद्रचूड यांनी खंडपीठातील यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी आजसाठी घेण्यात आली. तोपर्यंत वाराणसी न्यायालयाने कोणताही निर्णय देऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे.