देशात ‘अभी नही तो कभी नही’ अशी स्थिती आहे; राज ठाकरे

    दिनांक : 02-May-2022
Total Views |

शरद पवारांना 'हिंदू' शब्दाची एलर्जी

औरंगाबाद :(दि. १ मे) महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून औरंगाबाद येथे राज ठाकरेंच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
 
 
raj1
 
 
राज ठाकरे पुढे म्हणाले, "आजवर शरद पवारांच्या तोंडी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कधी ऐकले नाही. राष्ट्रवादीच्या सभांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटोही कधी नसायचा. मी जातीचं राजकारण करतो असं म्हणणाऱ्या पवार साहेबांना मी एकाच सांगू इच्छितो; मी जात मानत नाही. कोणत्या ब्राम्हणांची किंवा इतर कोणाचीही बाजू घेण्यासाठी मी इथे उभा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली. त्यात तुम्ही विष कालवले, तेही केवळ मतांसाठी. आज शाळेतली मुलं एकमेकांच्या जातीविषयी विचार करु लागली आहेत. यासाठी महाराष्ट्र दिवस साजरा करायचा का?,”
 
अन् राज ठाकरेंच्या भाषणादरम्यान  सुरु झाली अजान...
 
"शरद पवारांना हिंदू या शब्दाची मुळात एलर्जी आहे. महाराष्ट्र हा शाहू, फुले, आंबेडकरांचा आहेच, पण त्याआधी तो आमच्या शिवछत्रपतींचा आहे. शाहू, फुले, आंबेडकर हे त्यांचाच विचार घेऊन पुढे आलेली मंडळी आहेत. पण शरद पवारांच्या तोंडी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कधी ऐकले नाही आणि त्यांच्या सभेत कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटोही दिसला नाही.", असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. रविवारी 
 
राज ठाकरेंनी औरंगाबादच्या सभेत पुन्हा एकदा बेकायदा भोंग्यांच्या मुद्द्यावर भाष्य केलं. यापूर्वीच्या सभेत दिलेल्या अल्टिमेटमचा विषय पुन्हा काढला, मात्र त्यावेळी अचानक अजान सुरु झाली. त्यावेळी राज ठाकरेंनी भाषण थांबवत त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "माझी पोलिसांना नम्र विनंती आहे जर हे सभेच्यावेळी बांग सुरू करणार असतील तर आपण आत्ताच्या आत्ता यांच्या तोंडात बोळा कोंबावा. सरळ मार्गाने त्यांना समजत नसेल, तर मग पुढे काय होईल मला माहिती नाही. त्यामुळे संभाजीनगरच्या पोलिसांनी मी पुन्हा विनंती करतोय, हे जर या पद्धतीने वागणार असतील, तर यांना महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे ही दाखवाविच लागेल."
 
अभी नही तो कभी नही
 
"सध्या देशात ‘अभी नही तो कभी नही’ अशी स्थिती आहे. त्यामुळे सर्व देशवासीयांना विनंती आहे की जर यांनी ३ मेपर्यंत यांनी ऐकलं नाही, तर ४ मे रोजी प्रत्येक ठिकाणी हनुमान चालिसा ऐकू आलीच पाहिजे. वाटल्यास पोलिसांकडून रितसर परवानगी घ्या. ती परवानगी घेऊनच तुम्ही या सर्व गोष्टी जोरात करा. असे केल्यानेच इतक्या वर्षांचा प्रलंबित प्रश्नाचा कायमचा निकाल लागेल. त्यामुळे यासाठी सर्वांनी हातभार लावावा.”, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.