राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यास साध्वी कांचनगिरी यांचा पाठिंबा

    दिनांक : 19-May-2022
Total Views |
नवी दिल्ली : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या साधू संत वर्ग हा भक्कमपणे पाठीशी असून ते ५ जून रोजी अयोध्येत येणारच. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप खासदार बृजभूषण सिंह यांना विरोध करण्याची मागणी साध्वी कांचनगिरी यांनी पत्रामार्फत पंतप्रधान मोदी यांना केली आहे. तसेच राज ठाकरे अयोध्येत आल्यानंतर बृजभूषण सिंह यांनी त्यांना विरोध केल्यास त्यांना माझ्यासह साधुसंतांचा सामना करावा लागेल, असा आक्रमक इशाराही गुरुवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत असतांना दिला.


sk

बृजभूषण सिंह यांना उत्तर भारतीयांविषयी इतकेच वाटत होते तर त्यांनी या ठिकाणी एखादी कंपनी सुरु करायला पाहिजे होती, असे साध्वी कांचनगिरी यांनी म्हटले आहे. तुमच्या घरात चार लोक असतील, आणि बाहेरील १० जण येऊन तुमचे जेवण खात असतील, तर शांत कसे बसायचे?, असा सवाल कांचनगिरी यांनी उपस्थित करून  राज ठाकरे विरोध करणाऱ्या बृजभूषण सिंह यांचे हात रक्ताने माखलेले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
 
गेल्यावर्षी कृष्णकुंजवर साध्वी कांचनगिरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी कांचनगिरी यांनी राज ठाकरे यांन अयोध्येला येण्याचे निमंत्रणही दिले होते. आता राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा निश्चित झाल्यानंतर साध्वी कांचनगिरी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या आहेत. एवढेच नव्हे तर राज ठाकरे यांच्यासाठी साध्वी कांचनगिरी खासदार बृजभूषण सिंह यांच्याविषयी आक्रमक झाल्या आहेत.