काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धूला १ वर्षाचा तुरुंगवास

    दिनांक : 19-May-2022
Total Views |
 
नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांना एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 1988 च्या रोड रेज प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज नवज्योतसिंग सिद्धू यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. रोड रेज प्रकरणी शिक्षेत वाढ करण्याच्या नवज्योत सिंग सिद्धूंच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबाच्या वतीने पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती.
 
 
 

siddhu
 
 
याआधी पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने (Punjab Hariyana High Court) सिद्धूला हत्येप्रकरणी दोषी ठरवत तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती, तर सुप्रीम कोर्टाने त्याला हत्येप्रकरणी निर्दोष ठरवले होते, मात्र दुखापतीसाठी 1,000 रुपये दंड ठोठावला होता.
 
खालच्या न्यायालयाकडून निर्दोष सुटका
 
सप्टेंबर 1999 मध्ये याच प्रकरणात नवज्योतसिंग सिद्धू याची खालच्या न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. परंतु डिसेंबर 2006 मध्ये उच्च न्यायालयाने सिद्धू आणि अन्य एकाला दोषी ठरवून तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती, याप्रकरणी दोन्ही आरोपी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते, . याच प्रकरणी पीडित पक्षाच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यात आली होती.
 
सर्वोच्च न्यायालयाने नवज्योतसिंग सिद्धू यांना दोषमुक्त करण्याच्या मे 2018 च्या आदेशाचे पुनरावलोकन केले आहे. या आदेशानुसार सिद्धूला पंजाब पोलीस ताब्यात घेणार आहेत. आता आयपीसीच्या कलम ३२३ अंतर्गत सिद्धूंना जास्तीत जास्त शिक्षा सुनावण्यात आली आहे
 
काय आहे प्रकरण?
 
पतियाळा येथे 1988 मध्ये नवज्योत सिद्धू यांचे पार्किंगवरून भांडण झाले होते ज्यात एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. यापूर्वी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूंना ५० हजार रुपयांचा दंड ठोठावून त्यांची सुटका केली होती. त्याविरोधात पीडित पक्षाने पुनर्विचार याचिका दाखल केली होती.