गुजरातमधील मोठी दुर्घटना : कारखान्याची भिंत कोसळून 12 कामगारांचा मृत्यू

    दिनांक : 18-May-2022
Total Views |
 
 

morabi
 
 
 
 
 
अहमदाबाद : Wall Collapse in Morbi: गुजरातमधील मोरबी येथील सागर सॉल्ट कंपनीची भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या अपघातात 12 कामगारांचा मृत्यू झाला. भिंत पडल्याने तिथल्या मिठाच्या गोण्या खाली पडल्याचे दिसून येते. त्यात अनेक लोक गाडले गेले आहेत.स्थानिक लोक आणि कारखान्याचे कामगार भिंतीवरील मलबा आणि पोत्या काढून खाली गाडलेल्या लोकांना बाहेर काढत आहेत. तर जखमींना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली अनेक मजूर अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. अपघातानंतर घटनास्थळी मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.