1993 साखळी बॉम्ब स्फोटातील मास्टरमाईंड अबू बकरसह अन्य तीन जणांना अटक

    दिनांक : 17-May-2022
Total Views |
अहमदाबाद :  संयुक्त अरब अमिरातीत मोठी कारवाई झाली आहे. यामध्ये 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटात सहभाग असणाऱ्या अबू बकरला अटक झाली आहे. भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एकाला पकडण्यात भारतीय एजन्सींना यश आलं आहे. 12 मार्च 1993 ला मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी 12 बॉम्बस्फोट झाले होते. यामध्ये 257 लोकांचा जीव गेला होता. तर, 713 जखमी झाले होते.

1993 bomb1 
 
१९९३ च्या बॉम्बस्फोटातील हे चारही आरोपी परदेशात पळून गेले होते. त्यानंतर हे बनावट पासपोर्ट द्वारे अहमदाबाद मध्ये आले होते. अटक झालेल्यां मध्ये अबू बाकर, यसुफ भटका, शोएब बाबा आणि सय्यद कुरेशी यांनी गुप्तचर यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी आपला ठाव ठिकाणा बदलला होता. त्यांच्या पासपोर्ट मध्ये लिहिलेली माहिती बनावट असल्याचे आढळून आले आहे.
 
पाकव्याप्त काश्मीरमध्ये शस्त्रास्त्रं आणि स्फोटकांचे प्रशिक्षण देण्यात अबू बकरचा सहभाग होता. मुंबईच्या मालिका बॉम्बस्फोटात वापरलेले आरडीएक्सचं कोकणात लँडिंग आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या दुबईतील निवासस्थानी कट रचण्यातही तो सहभागी होता, अशी माहिती तपासात समोर आली होती. 1993 च्या बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार म्हणून ओळखल्या जाणार्‍या अबू बकर हा यूएई आणि पाकिस्तानमध्ये वास्तव्यास होता. यूएईमधील भारतीय एजन्सीच्या माहितीवरून त्याला नुकतेच पकडण्यात आल्याचं कळले आहे.
 
2019 मध्ये अबू बकरला अटक करण्यात आली होती. पण कागदपत्रांच्या समस्यांमुळे तो संयुक्त अरब अमिरातीच्या अधिकार्‍यांच्या ताब्यातून सुटला. अधिकृतपणे त्याला जाळ्यात घेण्यात अपयश आलं होतं. यूएईने त्याला अटक केल्यानंतर आता भारतीय एजन्सी बकरच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेत आहेत. भारताच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत त्याचं नाव आल्यानंतर जवळपास 29 वर्षांनी बकर सापडला आहे. त्याचं प्रत्यार्पण करण्याच्या प्रक्रियेत कायदेशीर अडथळेही येण्याची शक्यता आहे.