ज्ञानव्यापी मशिदीतील ‘ती’ जागा तात्काळ सील करा : वाराणसी कोर्ट

    दिनांक : 16-May-2022
Total Views |
वाराणसी : ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग मिळाल्याच्या दावा करण्यात आलेला असून वाराणसी कोर्टाने ती जागा सील करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने जिल्हा दंडाधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशानुसार, शिवलिंग प्राप्त झालेल्या जागेला तात्काळ सील करून कुणालाच त्या जागी प्रवेश न देण्याची  जबाबदारी जिल्हा प्रशासन आणि सीआरपीएफकडे सोपवण्यात आली आहे.
 
 

masjid
 
 
जिल्हा अधिकारी, पोलिस आयुक्त आणि सीआरपीएफ कमांडंट यांना वरील सर्व अधिकारी सील केलेल्या ठिकाणाच्या संरक्षणासाठी आणि सुरक्षेसाठी वैयक्तिकरित्या जबाबदार असतील. वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षण संपले होते, पण शिवलिंग सापडल्याच्या दाव्यांवरुन आता वादळ आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून टीम बाहेर पडताच हिंदू पक्षांनी शिवलिंग मिळाल्याचा दावा केला.