प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्कची ट्विटर डील स्थगित

    दिनांक : 13-May-2022
Total Views |
बऱ्याच दिवसांपासून जगभरात मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट 'ट्विटर' प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क विकत घेणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरु होती. पण आता मात्र एलन मस्क यांनी ट्विटर डील तात्पुरती स्थगित करण्यात आल्याचे आज ट्विट करून घोषित केल्याने चर्चांना ब्रेक लागणार आहे.
 
 
 
em 
 
 
 
एलन मस्क म्हणाले की ट्विटरवर सद्य परिस्थितीत ऍक्टिव्ह असणाऱ्या बनावट अकाऊंट्सची माहिती अद्याप ट्विटरकडून आमच्या टीमला मिळालेली नाही. त्यामुळे ही डील तात्पुरती स्थगित करण्यात येत आहे. भविष्यात डीलचं काय होणार याबाबत मस्क यांनी काहीच स्पष्ट केलेलं नाही.
 
४४ अब्ज डॉलर्सचा हा करार
 
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटर $44 अब्ज डॉलर्समध्ये खरेदी करण्याची घोषणा केली. या वर्षी हा करार पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे. त्यानंतर ट्विटरवर इलॉनचे पूर्ण नियंत्रण असेल आणि ट्विटर ही खासगी कंपनी बनेल. पण आता मात्र तात्पुरती का होईना पण डील रद्द केली गेलेली आहे.