उडिसात उभारले जाणार जगातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम

    दिनांक : 12-May-2022
Total Views |
भुवनेश्वर : हॉकी खेळास प्रोत्साहन देण्यासाठी उडिसा सरकारने पुढाकार घेतला आहे. उडिसासरकारकडून बिरसा मुंडा यांच्या नावाने रुरकेला या ठिकाणी जगातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम उभारले जाणार आहे. २०२३ साली भारतात होणाऱ्या पुरुष हॉकी विश्वचषकासाठी हे स्टेडियम उभारले जाणार असून जानेवारी महिन्यात हा विश्वचषक होणार आहे.
 
 
 

stadium
 
 
२० हजार प्रेक्षक बसतील इतके मोठे हे स्टेडियम असणार आहे. सरकारकडून या स्टेडियमसाठी ३०० कोटींची तरदूद केली गेली आहे. तसेच राज्य सरकारने राज्यात हॉकी प्रशिक्षण केंद्रेही उभारली आहेत. तसेच खेळाडूंना पोषक वातावरण तयार होण्यासाठी सर्व सुविधा पुरवण्यामध्ये उडिसा सरकार नेहमी अग्रेसर राहिलेले आहे.