‘हिंदू युनायटेड फ्रंट’ संघटनेकडून मागणी ; कुतुबमिनार’चे नामकरण ‘विष्णुस्तंभ’ करावे

    दिनांक : 11-May-2022
Total Views |
नवी दिल्ली : दिल्लीतील ‘कुतुबमिनार’चे नामकरण करणे बाबत ‘हिंदू युनायटेड फ्रंट’ या संघटनेकडून मागणीने जोर धरला आहे.
कुतुबमिनार’चे नामकरण ‘विष्णुस्तंभ’ करण्यात यावे आणि तेथे पूजाअर्चा करण्याची परवानगी देण्यात यावी . , अशी मागणी ‘हिंदू युनायटेड फ्रंट’ या संघटनेने केली आहे. 
 


minar
 
 
 
‘हिंदू युनायटेड फ्रंट’ या हिंदुत्ववादी संघटनेने मंगळवारी ‘कुतुबमिनार’ येथे हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, घटनास्थळी संघटनेचे कार्यकर्ते पोहोचताच पोलिसांनी त्यांची धरपकड केली. संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष जयभगवान गोयल यांनी ‘कुतुबमिनार’चे नाव बदलून ‘विष्णुस्तंभ’ करण्यात यावे आणि तेथे असलेल्या हिंदू देवतांच्या मूर्तींची पूजाअर्चा करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली. त्याचप्रमाणे परिसरातील ‘कुव्वत-उल-इस्लाम’ मशिदीस मंदिर घोषित करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.