भारतीय रेल्वेकडून महिला प्रवाशांसाठी एक विशेष सुविधा ; ट्रेनमध्ये काळजी न करता झोपणार आई आणि बाळ

    दिनांक : 11-May-2022
Total Views |
दिल्ली :  भारतीय रेल्वेने महिला प्रवाशांसाठी एक विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या अंतर्गत ज्या महिलांना लहान बाळ आहेत त्यांच्यासाठी लखनऊ ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या लखनऊ मेल ट्रेनमध्ये एक नवीन कोच तयार करण्यात आला आहे.
 
 

baby birth 
 
 
 
जाणून घेऊया या विशेष  बेबी बर्थ चे वैशिष्ट्य
 
या डब्यात महिला प्रवाशांच्या नवजात बालकासाठी बेबी बर्थ जोडण्यात आली आहे. जेणेकरुन मातांना त्यांच्या बाळांसह आरामात झोपता येईल.
 
लोअर बर्थला रेल्वेने एक खास सीट लावण्याची व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर लहान बाळ झोपेत खाली पडू नये यासाठी उपाय म्हणून रेल्वे बर्थच्या बाजूला स्टॉपर देखील लावण्यात आले आहे. बेबी बर्थमध्ये मुलांच्या सुरक्षेची संपूर्ण खबरदारी या घेण्यात आली आहे.'बेबी बर्थ' 770 मिमी लांब आणि 255 मिमी रुंद असेल, तर त्याची जाडी 76.2 मिमी ठेवण्यात आली आहे. सध्या याची चाचणी सुरु आहे. जर ही चाचणी यशस्वी ठरली, लवकरच हा बेबी बर्थ अनेक ट्रेनमध्ये पाहायला मिळणार आहे.