असला जवाहिरी ठेचावाच!

    दिनांक : 09-Apr-2022
Total Views |

अयमान अल जवाहिरी माध्यमांना वापरण्याचा सल्ला देतो. ते वापरणे नक्कीच धर्मांध मुस्लिमांच्या बाजूचे असावे, अशीच त्याची इच्छा आहे. अर्थात, भारतातल्या तथाकथित पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, उदारमतवादी टोळक्याने आपल्या दिशाभूलीच्या कसबाने त्याची तजवीज आधीच करून ठेवलेली आहे.

muslim 
 
आपल्याकडल्या भणंग विद्वानांनी आणि भोंगे उतरवायला सांगितल्याबरोबर पोटशूळ उठलेल्यांनी पाहावे, असे काही घडले आहे. ‘अल कायदा’चा विद्यमान म्होरक्या आणि ओसामा बिन लादेनचा जिवलग चमचा असलेल्या अयमान अल जवाहिरीने आपला एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. इस्लाम धर्मासाठी लढणार्‍याला ज्या ठिकाणी लपून हे असले उद्योग करावे लागतात त्या ठिकाणाहूनच त्याने हा व्हिडिओ केला आहे. काश्मीरमधला दहशतवाद हा त्याच्या व्हिडिओचा विषय. जवाहिरीने जहरी वक्तव्य केले याचे दु:ख नाही. सापच तो, वळवळणारच. मात्र, या व्हिडिओला २४ तास उलटून गेले तरी त्याचा या देशातल्या एकाही मुस्लीम नेत्याने विरोध करू नये हे खेदजनक आहे. खर्‍या लढायांपेक्षा आभासी माध्यमातून अभिमत निर्माण करण्याचे तंत्र गेल्या दहा वर्षात तयार झाले आहे. आपल्या दुबळ्या मुख्यमंत्र्याला ‘बेस्ट सीएम’ म्हणून टिव्ही चॅनलवर सिद्ध करण्याचा हा प्रकार. रोज पत्रकार परिषदा घ्यायच्या आणि त्यातून दुबळ्या पिपाण्या वाजवायच्या. अल जवाहिरीचेही काहीसे असेच सुरू आहे. भारतीय लष्कराने काश्मीरमध्ये ज्या प्रकारची लांडगेतोड चालविली आहे त्याचेच हे परिणाम आहेत. थेट लढाई आता शक्य नाही. जिथे जिथे त्यांनी असे प्रयत्न केले तिथे दहशतीशिवाय त्यांना काहीच हाताला लागले नाही.
 
दार-उल-इस्लामचे स्वप्न, तर कधीच पूर्ण करता आले नाही, भारतात तर कधीही शक्य होणार नाही. मात्र, या निमित्ताने धर्मांध मुसलमानांच्या नव्या कार्यपद्धतीचे आकलन मात्र नक्कीच होते. माध्यमे आणि बंदुकाही वापरण्याचा सल्ला तो देतो. आता आपल्याकडे माध्यमांना कसे वापरले जाते ते पाहू. मांड्यामध्ये बुरखा आणि ‘हिजाब’ घालून महाविद्यालयात शिरणारी आणि ‘अल्ला-हू-अकबर’च्या घोषणा देणारी मुस्लीम मुलगी सगळ्याच माध्यमांचा ताईत बनली होती. तिचे कौतुक काय तर इतक्या मोठ्या तरुणांच्या जमावासमोर ती एकटी घोषणा देत जात होती. तिचे वर्णन वाघिण वगैरे केले गेले; जणु काही ती महिलांच्या मुक्तीचे प्रतिकच आहे, असा तिचा अवतार सादर केला गेला. प्रकरण जोरात होते तेव्हा सतत फक्त त्या मुलीला क्रांतिकारकासारखे दाखवले. इस्लामी कट्टरपंथियांच्या भारतात राहून त्यांना जे काही करायचे आहे, त्या अजेंड्याच्या प्रचार-प्रसारासाठी भारतीय माध्यमे राबत असल्याचे त्यातून दिसले. धर्मांध मुस्लीम आपल्याला हवे तसे त्यांना वापरून घेत होते.
 
आता अयमान अल जवाहिरीनेदेखील माध्यमांचा वापर करून घ्या, असे सांगितले. भारतीय माध्यमे ‘हिजाब’सारखा वादग्रस्त मुद्दा पुढे आला की, कायदा सुव्यवस्था राखण्याची पोपटपंची करतात. पण, ज्या मुलीला दिवसभर टिव्हीच्या पडद्यावर दाखवत असतो, त्यातून प्रत्यक्षात आपण कायदा सुव्यवस्था बिघडवणार्‍यांसाठीच काम करत असल्याचेही त्यांच्या लक्षात येत नाही. इतकी त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. ‘हिजाब’प्रमाणेच आणखी एक मुद्दा पुढे आला, तो म्हणजे, मशिदींवरील बेकायदा भोंग्यांचा. मनसेप्रमुख राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे बंद झाले नाही, तर त्यापुढे हनुमान चालीसा लावू, असा इशारा दिला. त्यानंतर त्या मुद्द्यावरून गोंधळ सुरु झाला. पण, माध्यमांना अनधिकृत भोंग्यांमुळे होणारा त्रास पुढे आणावा असे वाटले नाही. त्याचबरोबर ध्वनिप्रदूषणाविरोधात लढणार्‍या तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांनीही त्यावर चिडीचुप राहणे पसंत केले. पण, काही वर्षांपूर्वी त्यांच्यातल्याचपैकी एकाने मुंबईतील शिवाजी पार्कवर होणार्‍या राजकीय भाषणांना विरोध केला. त्यातून ध्वनिप्रदूषण व त्याने सर्वसामान्य जनतेला त्रास होतो म्हणून तिथली राजकीय भाषणे बंद झाली पाहिजे, असे त्यांचे म्हणणे. त्यासाठी त्या सामाजिक कार्यकर्त्याने न्यायालयाचेही दार ठोठावले. राजकीय भाषण असले की, तिथे जाऊन आवाजाचे नमुने गोळा करायचे आणि ते न्यायालयात सादर करायचे, असा प्रकार त्यांनी केला. त्यावर न्यायालयानेही निकाल दिला. योगायोगाने शिवाजी पार्कवरील राजकीय भाषणांविरोधात न्यायालयात जाणारी व्यक्ती मुस्लिमच होती. पण तो योगायोग कसा काय मानावा? आज मशिदींवरील बेकायदेशीर भोंग्यांचा मुद्दा पुढे आलेला आहे. त्यावर दिवसातून पाच वेळा मोठ्या आवाजातील अजान वगैरेंनी शाळा, महाविद्यालये, सर्वसामान्य नागरिक, आजारी व्यक्ती, प्राणी, अशा सर्वांनाच त्रास होतो. पण त्याविरोधात न्यायालयात जाण्याची बुद्धी ध्वनिप्रदूषणविरोधकांना झाली नाही.
 
तर, ही विसंगती दाखवून देण्याचे भानही माध्यमांना राहिलेले नाही. म्हणूनच अयमान अल जवाहिरी माध्यमांना वापरण्याचा सल्ला देतो. ते वापरणे नक्कीच धर्मांध मुस्लिमांच्या बाजूचे असावे, अशीच त्याची इच्छा आहे. अर्थात, भारतातल्या तथाकथित पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, उदारमतवादी टोळक्याने आपल्या दिशाभूलीच्या कसबाने त्याची तजवीज आधीच करून ठेवलेली आहे. इस्लामी कट्टरपंथियांनी कुकृत्य केले, सार्वजनिक ठिकाणी धर्माचा अतिरेक केला तरी त्याला धार्मिक स्वातंत्र्याच्या चौकटीत बसवण्याचा वा मासूम ठरवण्याचा वा मनोरुग्ण म्हणण्याचा वा त्याच्या आई-वडिलांच्या मुख्याध्यापक, डॉक्टरकीसारख्या पेशाचा आधार घेऊन बचाव करण्याचा प्रकार इथेच चालतो. माध्यमेदेखील त्यात विवेकाचा वापर न करता जे समोर दिसत आहे, त्यानुसारच वागतात. त्या खुळ्यांना आपण नेमके काय करत आहोत, हेही समजत नसते. अशा परिस्थितीत अयमान अल जवाहिरीने धर्मांधांना माध्यमांना वापरून घेण्याचे आवाहन केले. त्यातून यापुढे माध्यमांची परिस्थिती आणखी विचित्र होऊ शकते. कारण, आज एक अयमान अल जवाहिरी बोलत आहे, तेच माध्यमांचा वापर करून घेतल्यावर माध्यमांच्या मुखातून शेकडो अयमान अल जवाहिरी बोलताना दिसतील. हे थांबवणे गरजेचे आहे. त्यासाठी अयमान अल जवाहिरीला तर ठेचावेच लागेल, पण त्याच्या अपेक्षेप्रमाणे वर्तन करणार्‍यांना व आपला वापर करू देणार्‍या माध्यमांशीही तसेच वागावे लागेल, तर देशात कायद्याचे राज्य नांदेल.