केंद्र शासनाची शेतकऱ्यांसाठी पेंशन योजना ;शेतकऱ्यांना दरमहा मिळणार ३ हजार रुपये पेन्शन, जाणून घ्या

    दिनांक : 28-Apr-2022
Total Views |
नवी दिल्ली : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी अनेक योजना राबवत आहे. यामध्ये किसान सन्मान निधीसह अनेक योजनांचा समावेश आहे. आता केंद्र सरकार 60 वर्षांवरील शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना राबवत आहे. त्याचे नाव पीएम किसान मानधन योजना आहे. याअंतर्गत ६० वर्षांवरील Farmers pension शेतकऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये किंवा वार्षिक ३६ हजार रुपये पेन्शन दिली जाणार आहे. नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) च्या Farmers pension अहवालानुसार, देशातील 10.07 कोटी कुटुंबे शेतीवर अवलंबून आहेत. ही संख्या देशातील एकूण कुटुंबांच्या 48 टक्के आहे.
 
 
 

pention
 
 
 
एवढ्या मोठ्या लोकसंख्येला विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवता येणार नाही. यामुळेच याअंतर्गत ६० वर्षांवरील Farmers pension शेतकऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये किंवा वार्षिक ३६ हजार रुपये पेन्शन दिली जाणार आहे.
 
जाणून घ्या योजनेबाबत सविस्तर
 
१. या पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना Farmers pension आधी गुंतवणूक करावी लागेल.
 
२. 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकरी पीएम किसान मानधन योजनेत गुंतवणूक करू शकतात.
 
३. या योजनेंतर्गत ६० वर्षांनंतर शेतकऱ्यांना दरमहा ३००० रुपये पेन्शन दिली जाते. मात्र, पेन्शन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आधी छोटी गुंतवणूक करावी लागते.
 
४. गुंतवणुकीची रक्कम 55 ते 200 रुपये प्रति महिना असणार आहे. एका शेतकऱ्याला वयाच्या 18 व्या वर्षी 55 रुपये, तर 40 व्या वर्षी दरमहा 200 रुपये गुंतवावे लागतात.
 
५. वयाच्या ६० वर्षानंतर त्यांना पेन्शन मिळू लागेल. 2019 मध्ये प्रधानमंत्री मानधन योजना लागू करण्यात आली.
 
केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ त्या सर्व शेतकऱ्यांना Farmers pension मिळू शकतो, जे पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेत आहेत. मात्र, त्याचवेळी जास्तीत जास्त २ हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन असलेले शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. PM किसान सन्मान निधी कडून मिळालेल्या 6000 रुपयांपैकी, या योजनेत थेट गुंतवणूक करण्याचा पर्याय निवडण्याची सूट आहे. अशा प्रकारे शेतकऱ्याला थेट खिशातून पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाही.