...हा तर रडीचा डाव !

    दिनांक : 24-Apr-2022
Total Views |

अग्रलेख

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार Corruption in Mumbai Municipal Cooperation चव्हाट्यावर आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीने BJP सुरू केलेल्या पोलखोल यात्रेच्या PolKhol Yatra रथाची तोडफोड करणे आणि अन्य प्रकारे या यात्रेला अटकाव करण्याचा किंवा तीत अडथळे आणण्याचा प्रयत्न करणे हा रडीचा डाव आहे.

 
Corruption in Mumbai Municipal Cooperation

 

मुंबईतील चेंबूर भागात यात्रेच्या रथाची तोडफोड अज्ञातांकडून करण्यात आली. नेहमीप्रमाणे पोलिस त्या अज्ञातांचा शोध घेत आहेत. याशिवाय, कांदिवली व दहिसर भागातही यात्रेला अटकाव करण्याचा प्रयत्न झाला. सध्या मुंबईत शिवसेना विरुद्ध भाजपा हा संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे.
 

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार Corruption सर्वश्रुत आहे. त्याच्या विरुद्ध भाजपाने पोलखोल यात्रा नावाचे अभियान सुरू केले आहे. विरोधी पक्ष म्हणून भ्रष्टाचार Corruption, अनाचाराविरुद्ध जनजागरण करणे आणि राज्यकत्र्यांना त्याबद्दल जाब विचारणे हा भाजपाच्या कर्तव्याचा भाग आहे आणि ती भूमिका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांच्या नेतृत्वाखाली भाजपा चांगल्या प्रकारे पार पाडत आहेत. पोलखोल यात्रेच्या रथाच्या तोडफोडीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी अधिक आक्रमकतेने ही यात्रा चालू ठेवण्याची जी घोषणा केली, त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे Mahavikas aghadi sarkar धाबे दणाणले असणार. तसेही हे सरकार घाबरट आहे आणि घाबरट लोक रडीचे डाव खेळतात ही जगाची रीत आहे. महाराष्ट्राला Maharashtra अशा जनजागरण यात्रांची नवलाई नाही. शिवसेनेला तर ते लक्षात ठेवलेच पाहिजे.

 

दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे Gopinath Munde यांच्या नेतृत्वात ज्येष्ठ नेते शरद पवार Sharad Pawar यांच्या नेतृत्वातील सरकारच्या विरोधात संघर्ष यात्रा काढण्यात आली होती. त्यावेळच्या सरकारच्या भ्रष्टाचाराचा आणि विशेषतः अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांचा पाढा गोपीनाथ मुंडे व अन्य नेत्यांनी लोकांपुढे जाऊन वाचला. त्यामुळे १९९५ साली पहिल्यांदा महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आले. शिवसेनेला पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद गोपीनाथ मुंडे यांच्या त्या संघर्ष यात्रेमुळे मिळाले होते. आता तीच शिवसेना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्रीपद मिळवती झाली आणि सत्तेचा उपभोग घेते आहे. आणि त्या काळी शिवसेनेसोबत पवारांच्या विरोधात संघर्ष करणारी भाजपा आता विरोधी पक्ष म्हणून काम करीत आहे. शिवसेनेने यावेळी सत्ता कशी मिळवली Corruption हे सर्वांना ठाऊक आहे. लोकशाहीत संख्याबळ व बहूमत महत्त्वाचे असतेच. लोकतांत्रिक प्रक्रियेतील या दोषाचा फायदा घेऊन शिवसेनेने सत्ता मिळवली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पारंपरिक शत्रुंना सोबत घेऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray यांनी जीवनभर ज्यांच्या विरोधात भूमिका घेतली, त्यांना पवित्र करून घेतले व सत्तेतील भागिदारी स्वीकारली. हा कारस्थानाचा भाग एकदा बाजूला ठेवला आणि शिवसेनेला सत्ताधारी पक्ष म्हणून स्वीकारले तरी भाजपाचा आंदोलन Corruption करण्याचा, जनजागरण करण्याचा अधिकार संपत नाही. तो भाजपाचा अधिकारही आहे आणि कर्तव्यही आहे.

 

Corruption महाविकास आघाडी मात्र आपल्या कर्तव्यात चुकते आहे. एकीकडे भाजपाला आणि समविचारी संघटनांना कोणत्याही मुद्यावर आरोपीच्या पिंजऱ्यात उभे ठेवायचे, त्यांना लोकशाहीचे विरोधक म्हणून नावे ठेवायची आणि दुसरीकडे अप्रत्यक्षपणे पोलखोल यात्रेच्या मार्गात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा याला मर्दपणा म्हणता येत नाही. शिवसेनेला भाजपावर टीका करण्याचा अधिकार असेल तर तसाच अधिकार भाजपालाही आहे. मुंबई महापालिका हे भ्रष्टाचाराचे कुरण Corruption आहे. या महापालिकेवर दीर्घकाळापासून शिवसेनेची सत्ता आहे. देशातील सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष शेकडो कोटींचा मालक उगाच होत नाही. तो कुणाला पन्नास लाखांचे घड्याळ Corruption उगाच देत नाही आणि दोन-दोन कोटी दान-धर्म करण्यासाठी आपल्या मातोश्रीला देत नाही. ही सगळी प्रकरणे अलीकडची आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने ED यातला भ्रष्टाचार खणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवसेनेचे धाबे दणाणले आहेत. महाराष्ट्र, मराठी, अस्मिता, गद्दार याखेरीज शिवसेनेकडे मतदारांना सांगण्यासारखे काहीही नाही. त्यांच्या महापालिकेतील कारभाराबद्दल Corruption विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी अनेकदा टीका केली आणि त्यांची लक्तरे वेशीवर टांगली. अलीकडेच त्यांनी काँप्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल (सीएजी) CAG यांच्याकडून मुंबई महापालिकेतील गैरव्यवहारांची चौकशी व्हावी, अशी मागणीही केली होती.

 

मुंबई महापालिका अधिनियमांतील त्रुटींचा लाभ घेऊन हजारो कोटींचा भ्रष्टाचार Corruption झाल्याचे यापूर्वीही भाजपच्या महापालिकेतील गटनेत्यांनी जाहीरपणे सांगितले आहे. कामांची कंत्राटे आपल्या माणसांना वाटण्यासाठी निविदांचे तुकडे करणे, कोविडच्या काळात लोकांना दिलासा देण्यासाठी राबविलेल्या उपक्रमांतही खाबुगिरी करणे, स्थायी समितीकडे मुद्दाम विलंबाने प्रस्ताव आणणे असे अनेक प्रकार मुंबई महापालिकेत सुरू आहेत. त्यात हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आणि होतो आहे, हे शेंबडे पोर सुद्धा सांगू शकेल. अशा स्थितीत कोणताही मुद्दा उपस्थित झाल्यावर केवळ अस्मितेचे मुद्दे पुढे करणा़रया शिवसेनेच्या नाकाखाली होत आलेल्या या सैराट भ्रष्टाचाराच्या Corruption प्रकरणात भाजपाने पोलखोल करणे अपरिहार्य होते आणि तेच भाजपा करते आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने एक दमदार विरोधी पक्ष नेता महाराष्ट्र विधानसभेला आणि एकूणच महाराष्ट्राला मिळालेला आहे. त्यांची पाच वर्षांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द शिवसेनेसोबत पार पडली. त्यावेळी शिवसेना भाजपाच्या सोबत होती. आता दोघे एकमेकांचे विरोधक आहेत. परंतु, ज्या दमदारपणे आणि जिगरबाज पद्धतीने देवेंद्र फडणवीस शिवसेनेच्या भ्रष्टाचार-अनाचाराचे वाभाडे काढत आहेत, त्या तुलनेत शिवसेनेकडे देवेंद्र फडणवीस किंवा भाजपा यांच्याकडे दोष दाखवण्यासाठी काहीही नाही. असते तर त्यांनी ते एव्हाना वापरले असते. कारण मुंबई हा शिवसेनेचा प्राण आहे आणि तेथेच भाजपाने शिवसेनेच्या नाकात नकेल टांगण्याचा जाहीर कार्यक्रम सुरू केलेला आहे.

 

मुंबईतल्या अनेक बिल्डरांना महापालिकेतील सत्ताधा-यांनी मोठे Corruption केले. झोपडपट्टी पुनर्वसन योजना असो वा अन्य काही, अनेक ठिकाण़ी काळ्या यादीत असलेल्या कंत्राटदारांना कामे देण्यात आली. काही निविदा तर रातोरात वाटण्यात आल्या. हे सारे महापालिकेच्या रेकॉर्डवर आहे आणि त्याबद्दल भाजपाच्या सदस्यांनी अनेकदा आवाजही उचललेला आहे. आता फरक एवढाच की सभागृहाच्या बाहेर आणि ती सुद्धा मुंबईत शिवसेनेची पोलखोल Corruption सुरू झाली आहे आणि त्यामुळे शिवसेना बावचळून गेलेली दिसते. त्यामुळेच या ना त्या पद्धतीने पोलखोल यात्रेत अडचणी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झालेले दिसतात. शरद पवार स्वतःला फार मोठे लोकशाहीवादी समजतात. त्यांच्या पक्षाचा उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार Ajit Pawar हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सहकारी आहेत. देशातील एकेकाळचा सर्वांत मोठा पक्ष म्हणून ज्याची ओळख आहे, त्या काँग्रेसचे नेतेही या सरकारात आहेत. शिवसेनेला लोकशाहीचे वावडे असेल तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना लोकशाहीचे वावडे असण्याचे कारण नाही. त्यामुळे त्यांनी शिवसेनेला त्यांच्याच शब्दांत समजावून सांगण्याची गरज आहे. कर नाही त्याला डर कशाला, अशी सुभाषिते अनेकदा शिवसेनेच्या नेत्यांनी वापरलेली आहेत. त्यामुळे त्यांनी पोलखोल यात्रेच्या संदर्भात Corruption रडीचा डाव खेळू नये, असा सल्ला या सरकारचे सर्वेसर्वा म्हणून शरद पवार Corruption यांनी शिवसेनेला दिला पाहिजे आणि हा रडीचा डाव थांबवला पाहिजे.

 

सत्ताधीशांच्या गोटात शिरून मतलबाचा शिरा Corruption खाणा़रे विरोेधी पक्ष नेते महाराष्ट्राने अनेक पाहिले आहेत. शिवसेनेच्या नावात सेना असेल आणि त्यांचे प्रतीक वाघ असेल तरी खरा वाघ देवेंद्र फडणवीसांच्या निमित्ताने पहिल्यांदा शिवसेनेला अनुभवायला मिळत आहे. त्याचा सामना करण्यासाठी अस्मितांचे मुद्दे आता पुरेसे ठरणार नाहीत. वाघ नखे किंवा कोथळा सारखी जुनी पालुपदे कामाला येणार नाहीत. भाजपाशी आणि देवेंद्र फड़णवीसांशी सामना करायचाच असेल तर पोलखोल यात्रा थांबवण्यात हशील नाही. त्यापेक्षा सीएजीतर्फे मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या Corruption तक्रारींची चौकशी करण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे आव्हान शिवसेनेने स्वीकारले पाहिजे. शिवसेनेत थोडी फार सेना आणि थोडा फार वाघ शिल्लक असेल आणि कर नाही त्याला डर कशाला वाला फंडा त्यांना स्वतःला लागू होत असेल तर अशी चौकशी करण्यासाठी शिवसेनेनेच पुढाकार घेतला पाहिजे.