दिल्ली दंगलीचे कर्तेकरविते कोण?

    दिनांक : 21-Apr-2022
Total Views |

अग्रलेख

 दिल्लीत Jahangirpuri हनुमान जयंतीच्या शोभायात्रेवर दगडफेक आणि त्यानंतर जाळपोळ करत हिंसाचार भडकविणा-या शक्ती आता उघडकीस येऊ लागल्या आहेत.

 

Delhi 

 

त्याचबरोबर त्यांच्या मागे राजकीय शक्ती उभी करत या घटनांचा गठ्ठा मते मिळविण्यासाठी धडपड करणारेही हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने Home Ministry आणि दिल्ली महापालिकेने Delhi Municipalty दंगलखोरांकडे डोळे वटारून पाहताच त्यांनाही वाचविण्यासाठी स्वयंघोषित सेक्युलर आटापिटा करू लागले आहेत. आपण समाजाची शांतता बिघडविणा-या समाजकंटकांचे उघड समर्थन करत आहोत याची जरादेखील लाज या ढोंगी लोकांना वाटत नाही. या दंगलीचा मुख्य मास्टर माईंड महंमद अन्सार Mohmmed Ansar याला पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात उभे करताना तो झुकणार नाही, असे फिल्मी इशारे करण्याइतका निगरगट्ट गुन्हेगार आहे.
 

Jahangirpuri अन्सार याला अटक होताच आम आदमी पार्टीचा AAP नेहमीचाच खेळ सुरू झाला. अशा प्रकरणात करून सवरून नामानिराळे राहण्याचा दांभिकपणा आम आदमी पार्टीइतका अन्य कोणाला जमणे शक्यच नाही. त्यांनी अन्सार याचे जुने काहीही संबंध नसलेले भाजपा नेत्यासोबतचे फोटो लगेच सोशल मीडियावर टाकण्यास सुरुवात केली. मग भाजपाने त्या अन्सारचे आम आदमी पार्टीच्या नेत्यांसोबत कार्यक्रमातील फोटो उघड केले. हा महंमद अन्सार २०२० मध्ये झालेल्या दिल्लीतील दंगलीचा तुरुंगात असलेला मुख्य आरोपी आणि आम आदमी पार्टीचा तत्कालीन नगरसेवक ताहीर हुसैन याच्याशी संंबंधित आहेत. प्रत्येकवेळी आम आदमी पक्षाची माणसेच दंगलीच्या संदर्भात सापडतात आणि तरीही आम आदमी पक्षाचे लोक अगदी कोडगेपणाने उलट भाजपावरच किंचाळत आरोप करत सुटतात. हा आक्रस्ताळेपणाच त्यांच्या अशा घटनांमागील सहभागाचा खरे म्हणजे पुरावा असतो. Jahangirpuri पोलिसांनी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशीची घटना घडण्याच्या एक दिवस आधीच्या एका व्हिडिओमधून मुले काठ्या, बाटल्या यांची तयारी करतानाची दृश्ये मिळविली आहेत. यातून आणखी सत्य पुढे येईल.

 

महंमद अन्सार हा जहांगीरपुरीतील Jahangirpuri गुंड आहे आणि अवैध दारू धंदे, जुगार चालविणे हा त्याचा धंदा आहे. बेकायदेशीर हत्यारे बाळगल्याबद्दल त्याला जेलची हवा खावी लागली आहे. महिलांवर अत्याचाराच्या आरोपाखालीही त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. याचे आम आदमी पक्षाच्या एका आमदाराशी व अन्य अनेक नेत्यांशी जवळचे संबंध असल्याचा आरोप भाजपा नेते आदेश गुप्ता यांनी केला आहे. हनुमान जन्मोत्सवाच्या शोभायात्रेवर दगडफेक झाली आणि त्यानंतर जो हिंसाचार झाला त्यामध्ये नागरिक आणि पोलिस जखमी झाले. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही गटांतील २४ लोकांना ताब्यात घेतले होेते. जहांगीरपुरीतील Jahangirpuri कुशल चौकात ही घटना सुरू झाली. या कुशल चौकाचा थेट संबंध २०२० मध्ये झालेल्या दंगलीशी सुद्धा आहे. त्यावेळी येथून बांगलादेशी नागरिक, महिला, मुले सात बसेस भरून शाहीनबाग आंदोलनासाठी नेण्यात आले होते. हे सगळे संदर्भ लक्षात घेऊनच पोलिस तपास करत असल्याने यातील तथ्य अधिक तपशिलाने पुढे येईल. प्रत्यक्ष घटना घडली तेव्हा तेथे ज्या बाटल्या फेकल्या गेल्या त्या पुरविणारा भंगारवाला शेख हमीद याला पोलिसांनी अटक केली आहे.

Jahangirpuri दंगलीत फायरिंग करणारा सोनू शेख याच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. उत्तर प्रदेशात दंगेखोरांना आणि गुन्हेगारांना कसलाही दिलासा, सामोपचार न दाखविता कायद्यानुसार कारवाईचा जो धडाका योगी आदित्यनाथ यांनी लावला होता त्याचा एक चांगला परिणाम सर्वसामान्यांवर दिसून आला. विधानसभा निवडणुकीतही भाजपाला प्रचंड बहुमत देऊन जनतेने अशा कारवाईला आपला पाठींबा जणू व्यक्त केला. समाजकंटकांना लगाम घालण्यासाठी आता हाच पॅटर्न लागू केला पाहिजे. दिल्लीतील या दंगलीत जे आरोपी स्पष्ट झाले त्यांची घरे अतिक्रमण करून बांधलेली आहेत. दिल्ली महानगरपालिका भाजपाच्या ताब्यात आहे. त्यांनी लगेच तेथे अतिक्रमण हटाओ मोहीम सुरू करून बुलडोझरने पाडापाडी सुरू केली. ताबडतोब स्वयंघोषित सेक्युलर ढोंगी धावून आले. Jahangirpuri उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत या विषयात दाद मागितली गेली. उच्च न्यायालयाने पाडापाडीला स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाल्यानंतर त्यावर निर्णय होईल. मात्र, जे लोक नियम सरळ सरळ झुगारून देतात, सामाजिक शांततेला आणि सौहार्दाला नख लावून समाजविरोधी कृत्ये करतात, तेच धडधडीत अतिक्रमणे करून आपला उद्दामपणा सिद्ध करत समाजात दिमाखात वावरतात, त्यांच्यावर कारवाई प्राधान्याने केली पाहिजे.

 

मात्र, त्यांचे पंथ, जात, धर्म पाहून काही ढोंगी लोक गठ्ठा मतांसाठी अशा बेकायदेशीर व्यवहार करणा-यांच्या मागे उभे राहतात. दिल्लीमध्ये या गुन्हेगारांना पाठबळ देण्यासाठी काँगेस नेते राहुल गांधी, एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी, कम्युनिस्ट वृंदा करात हे सरसावले आहेत. Jahangirpuri तुकडे तुकडे गँग असो की दिल्लीचे दंगेखोर असोत, कसलाही विवेक न ठेवता केवळ मोदीविरोध आणि भाजपाविरोध यासाठी हे लोक गुन्हेगारांबरोबर उभे राहतात. जहांगीरपुरी प्रकरणात तर यांचे चेहरे उघडे पडले आहेत. देशातील सर्वसामान्य जनतेने अशा ढोंगी आणि लांगूलचालन करणाèया राजकारण्यांना खड्यासारखे बाजूला फेकले पाहिजे. जोपर्यंत मतदानातून अशा लोकांना मतदार धडा शिकवणार नाहीत तोपर्यंत हे लोक सुधारण्याची शक्यता नाही. दिल्लीत पोलिस हे केंद्रीय गृहखात्याशी जोडलेले असल्याने आम आदमी पक्षाने कोणत्याही घटनेबाबत हात झटकून टाकत या गोष्टीचा गैरफायदा घेण्याचाच प्रयत्न केला आहे. बेजबाबदारपणे उलट कायदा आणि सुव्यवस्थेचे गंभीर प्रश्न निर्माण होतील, अशा गोष्टींना प्रोत्साहन दिले आहे.

 

अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीशी संगनमत करून दंगलीसारख्या Jahangirpuri घटनांमागे यांचे आमदार, नगरसेवक यांचा सहभाग असल्याचे पूर्वी समोर आले आहे. या दंगलीत हे पुन्हा चर्चेत आहेत. पोलिसांनी अशा घटनांची पाळेमुळे शेवटपर्यंत तपास करून उघडी केली पाहिजेत. वर्षानुवर्षे या देशातील स्वयंघोषित सेक्युलर राजकारण्यांनी सामान्य जनतेची दिशाभूल करत सतत गठ्ठा मतांसाठी दंगली, संघर्ष, लांगूलचालन अशी नीती वापरली आहे. पाकिस्तानसारखे शत्रू देश मुंबईवर अतिरेकी हल्ला करतात, त्याला प्रत्युत्तरादाखल कारवाई करताना हे ढोंगी सेक्युलॅरिस्ट देशातील मुस्लिम मते मिळणार नाहीत याचा संकुचित विचार करतात. अगदी ओबामा यांनी पुस्तकात मनमोहनसिंग Jahangirpuri यांच्याशी झालेल्या संवादाचा हवाला देत ही गोष्ट उघड केली आहे. यांचा हा गठ्ठा मतांचा खेळ होताना सर्वसामान्यांचा जीव जातो, याची त्यांना जराही फिकीर नाही.

 

Jahangirpuri उलट, राहुल गांधींसारखे गरिबांचे नाव घेत सोयीने निर्बुद्ध ओरड करण्यात आघाडीवर राहतात. दंगलखोरांना जराही सहानुभूती न ठेवता त्यांची कायदेशीर कोंडी करत त्यांच्यावर कारवाई केली गेली पाहिजे. दंगली, संघर्ष, हिंसा अशा घटनांमधून सहीसलामत निसटून जाण्याची मोर्चेबांधणी या लोकांनी आणि त्यांच्या कर्त्याकरवित्यांनी केलेली असते. मात्र, त्यांच्यामुळे झालेले सार्वजनिक नुकसान भरून घेणे, अतिक्रमणासारख्या गोष्टींविरोधात कडक कारवाई करणे, नियमबाह्य वर्तनावर लक्ष ठेवून तात्काळ बडगा उगारणे अशा उपायांनीच हे समाजकंटक वठणीवर येतील. Jahangirpuri दिल्लीतील ही दंगल आणि त्यानंतर होणा-या घटनाक्रमाने एक प्रक्रिया समोर आणली आहे. त्याचा विचार केला गेला पाहिजे. दंगली आणि त्यांना छुपे पाठबळ देणारे संभावितपणाचा आव आणणा-या राजकीय शक्ती यांना धडा शिकवण्याची वेळ आता आली आहे.