सक्रिय सहभागाची अपेक्षा

    दिनांक : 02-Apr-2022
Total Views |

वेध

- पराग जोशी

 

हिंदू नववर्षाचा Gudhipadva प्रारंभ असलेली वर्षप्रतिपदा आणि रामनवरात्रीला प्रारंभ होत आहे. मागील दोन वर्षांपासून बंद ठेवण्यात आलेले धार्मिक उपक्रम, उत्सव आता प्रारंभ झाले आहेत.

 
gudi  

 

पण हिंदूंनो, उत्सव सुरू झाल्याच्या आनंदात न राहता सक्रिय सहभागासह कुटुंबीय आणि मित्रमंडळींसह हे उत्सव साजरे करण्याची गरज आहे.
 

मागील दोन वर्षांपासून शहरातील सर्व उपक्रम कोरोनाच्या नावाखाली बंद ठेवण्यात आले. आता मुभा दिली. त्यासाठी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी आदेश काढण्यात आले. शोभायात्रा, मिरवणुका, पालखी, प्रभातफेरी आदी पक्रमांचे आयोजन आणि व्यवस्था एका दिवसात करता येते का? हा खरा प्रश्न आहे. मागील सहा महिन्यांपासून राज्यात कोरोनाची स्थिती नगण्य होती. या काळात राज्यातील नागरिकांच्या मनात कोरोनाचे भय पसरविण्याशिवाय मंत्री व सनदी अधिकार्‍यांनी फार काही द्रष्टेपणाने केल्याचे दिसत नाही. गुढीपाडव्याच्या Gudhipadva दिवशी काढलेला आदेश तीन महिन्यांपूर्वी काढता आला असता, नागपुरातील राजजन्मोत्सव शोभायात्रा, पश्चिम नागपूर नागरिक संघाची शोभायात्रा, झुलेलाल जयंती शोभायात्रा या उपक'मांच्या आयोजकांनी चार महिन्यांपूर्वी शासनाकडे व मनपाकडे परवानगीसाठी अर्ज दिले आहेत. मागील आठ दिवसांपूर्वी या आयएएस अधिकार्‍यांनी त्यांना शासनाच्या आदेशाची प्रत जोडून 'नरो वा कुंजरोवा' स्वरूपाचे पत्र पाठविले. म्हणजे या पत्रात परवानगी दिल्याचा किंवा नाकारल्याचा स्पष्ट उल्लेख नाही. यासंदर्भात जिल्हाधिकारी किंवा निगमायुक्तांना निर्णय द्यायचा नसेल आणि केवळ तांत्रिकदृष्ट्या कागदांची देवाण-घेवाण करायची असेल तर अशा अधिकार्‍यांना आयएएस अधिकारी म्हणायचे का, हा खरा प्रश्न आहे. दुसरीकडे स्थानिक मंत्री आणि पालकमंत्र्यांनादेखील नागपूर शहराशी काही घेणे-देणे नाही. मुळात हे मंत्री स्वयंप्रकाशित नसल्याने दुसर्‍या मोठ्या वृक्षाच्या आधाराने वाढणार्‍या अमरवेली आहेत. त्यामुळे मागील तीन वर्षांत शहरातील सर्व व्यवस्थांचा चुराडा झाला आणि हेच या सरकारला हवे होते.

 

यात आणखी महत्त्वाचा भाग म्हणजे स्वत:ला हिंदुत्ववादी Gudhipadva म्हणविणारी शिवसेना बाळासाहेबांच्या निधनानंतर काँग्रेस -राकाँच्या ताटाखालचे मांजर बनली आहे. यासाठी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपा, भाजयुमो आणि इतर संघटनांना राज्यातील महाविकास आघाडी सरकारची ही चालबाजी जनतेपुढे आणण्याची आणि त्याविरोधात आंदोलन करून जनमत पेटविण्याची जबाबदारी होती. पण हे सर्व लोक एकमेकांची उणीदुणी काढण्यात व्यस्त आहेत. सत्तेच्या खेचाखेचीत मूळ बाबींकडे या सर्वांचे दुर्लक्ष होत आहे, ही बाब या लोकांना कळत नाही हे खरे दुर्दैव आहे. आता गुढीपाडव्याच्या दिवशी निरनिराळ्या आयोजनांमध्ये सर्वजण सहभागी होतील आणि दुसर्‍या दिवशी पुन्हा घरगुती नवरात्रात व्यस्त होतील. सामाजिक संघटनादेखील अशाचप्रकारे व्यस्त असल्याचे दिसत आहे आणि व्यस्त असल्याचा देखावा त्यांना करावयाचा आहे.

 

देशभरात आणि विदेशात इतर धर्मीयांनी हिंदू सण, उत्सवाविरुद्ध आणि इतर बाबींवर व्हॉट्स अ‍ॅप आणि समाजमाध्यमांमध्ये विखारी प्रचार सुरू केला आणि तो सातत्याने सुरू आहे. त्याला प्रत्युत्तर देण्याचे काम काही लोक स्वतंत्रपणे करीत आहेत, पण तेवढे पुरेसे नाही, ठोस उत्तर आणि प्रखरपणे प्रभावी बाजू मांडणे, खंडन करणे, शास्त्रीयदृष्ट्या त्यामागील कारणमीमांसा उत्तरादाखल आणि सुरू असलेला प'चार कसा खोटा, निरर्थक आणि द्वेषभावनेतून होत असल्याचे सांगणे ही काळाची गरज आहे.

 

'द काश्मीर फाईल्स' चित्रपटासंदर्भात घेतलेली भूमिका कायम राहणे अपेक्षित आहे. सध्या 'मी वसंतराव' या चित्रपटाला टॉकीज मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यासाठी युवा संघटनांनी अभियान छेडण्याची गरज आहे. ही बाब प्रत्येकवेळी कुणी सांगण्याची गरज नाही, ती जबाबदारी या संघटनांनी स्वयंस्फूर्तपणे सातत्याने मांडण्याची तसेच जनजागृती करण्याची गरज आहे. कोरोनानंतर स्थिती पूर्णपणे बदलली आहे. पूर्वीसारखे प्रकार करून आता चालणार नाही. मुख्य म्हणजे पुळचट आणि गुळगुळीत भूमिका घेणे बंद झाल्याशिवाय या विषवल्लींचे निर्दालन होणे शक्य नाही. विखारी प्रचार करणार्‍यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी नव्याने संघटनबांधणी करून यासाठी एक विशेष विभाग किंवा आघाडी तयार करणे अपेक्षित आहे. गुढी, मिरवणूक, शोभायात्रा Gudhipadva या मागील अर्थ इंग्रजाळलेल्या आणि अमाप पैशामुळे यापासून दूर गेलेल्या स्वकीयांमधील नव्या पिढीला समजावून सांगावा लागेल आणि दुसरीकडे या विरोधात प्रचार करणार्‍यांनादेखील उत्तर द्यावे लागेल. या पद्धतीने हिंदूंनी नववर्षाचे सकि'य सहभागाने स्वागत करणे अपेक्षित आहे.

- 9881717805