दशावतार सादरीकरण दरम्यान कलाकारास आला हृदयविकाराचा झटका

    दिनांक : 12-Apr-2022
Total Views |

सिंधुदुर्ग : दशावतार नाट्यप्रयोग सुरु असताना कलाकाराला हार्ट अटॅक आला. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर कलाकार स्टेजवरच कोसळला. केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गात आयोजित दशावतार महोत्सवात ही घटना घडली.

 
 
 
Sindhudurg
 
 

रेडी येथे शनिवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती मिळाली. हार्ट अटॅक आल्यानंतर कोसळलेल्या त्या कलाकाराला तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले, त्यामुळे त्याचे प्राण वाचले. सध्या तो कलाकार खासगी रुग्णालयात दाखल असून आता त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.