ऑस्ट्रेलियन पंतप्रधान गुजरात खिचडीचे चाहते

    दिनांक : 11-Apr-2022
Total Views |

नुकतंच भारत आणि ऑस्ट्रेलियात एक व्यापारी करार झाला. त्याचा आनंद साजरा करण्यासाठी मॉरिसन यांनी खिचडी बनवली. त्याचा फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी 'भारतासोबत आमचा नवीन व्यापार करार झाला.
 

K1 
 
 
त्याचा आनंद साजरा करण्यासाठी मी खिचडी बनवली. माझे प्रिय मित्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये ही खिचडी आवडीने खाल्ली जाते. मोदी यांनाही खिचडी आवडते. त्यामुळे मी हा पदार्थ बनवला आहे', असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. दरम्यान, मॉरिसन यांनी याआधीही केरळची एक प्रसिद्ध डिश बनवली होती. त्याचा फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये नुकतंच 'मुक्त व्यापार करार' झाला आहे. ज्या अंतर्गत भारतातील 6 हजारांहून अधिक वस्तू ऑस्ट्रेलियाला शुल्कमुक्त निर्यात केल्या जाऊ शकतात. ऑस्ट्रेलिया आणि भारताचे संबंध जपण्यासाठी आणि अधिक मैत्रीपूर्ण होण्यासाठी हा करार महत्वपूर्ण आहे. भारतासोबतच्या मुक्त व्यापार कराराबद्दल स्कॉट मॉरिसन खूप आनंदी आहेत.