नमाज पठणावेळीच बॉम्बस्फोट : ३६ ठार ५० जखमी

    दिनांक : 04-Mar-2022
Total Views |
कराची : पाकिस्तानात नमाजपठणावेळी झालेल्या बॉम्बस्फोटात तब्बल ३६ जणांचा मृत्यू झाला. यात ५० जण गंभीर जखमी झाल्याची प्रार्थमिक माहिती आहे. शुक्रवार दि. ४ मार्च रोजी पेशावरच्या कोचा रिलासदार भागात एका मशिदीच्या आवारात हा बॉम्बस्फोट झाला. यावेळी सर्वजण नमाजपठणासाठी जमले होते. ५० जखमींपैकी एकूण १० जणांची प्रकृती नाजूक आहे.

PAK 
 
हल्ला रोखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या एका पोलीसाचाही मृत्यू झाला. या संदर्भातील मिळालेल्या माहितीनुसार, दोन हल्लेखोर मशिदीच्या आवारात घुसण्याच्या प्रयत्नात होते. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोरांनी गोळीबार सुरू केला. यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर एक जण जखमी आहे.
 

PAK1 
 
दरम्यान, पोलिसांना चकवा देत हे हल्लेखोर मशिदीच्या आवारात घुसले. त्यानंतर एका हल्लेखोराने स्वत:ला बॉम्ब हल्ल्यात उडवून घेतले. बचाव पथकाने संबंधित घटनास्थाळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. दरम्यान, या प्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी शोक व्यक्त केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीचेही आदेश त्यांनी दिले आहेत.