युरोपातील सर्वात मोठा स्टील प्लांटमध्ये स्फोट...

    दिनांक : 20-Mar-2022
Total Views |

मारियुपोल : युक्रेनच्या दक्षिण-पूर्वेकडील शहर मारियुपोलमध्ये रशिया आणि युक्रेनच्या सैन्यामध्ये सर्वात मोठा स्टील प्लांट काबीज करण्यासाठी जोरदार युद्ध झाले. 

Mariupol steel plant 

 

रशियन सैन्याच्या हल्ल्यात युरोपातील सर्वात मोठ्या स्टील प्लांटपैकी एक प्लांट मारियुपोल येथे होता. हा प्लांट पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. युरोपातील सर्वात मोठ्या लोह आणि पोलाद कारखान्यांपैकी एक असलेल्या अझोव्स्टलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, असे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले.
 

युक्रेनच्या खासदार लेस्या वासिलेंको यांनी हा प्लांट उद्ध्वस्त झाल्यानंतर एक ट्वीट केलंय. त्यात म्हटलंय की, "युरोपमधील सर्वात मोठ्या स्टील प्लांटपैकी एक उद्ध्वस्त झाला. हा प्लांट उद्ध्वस्त होणं हे युक्रेनसाठी खूप मोठं आर्थिक नुकसान आहे. शिवाय यामुळे पर्यावरणाचेही मोठे नुकसान झाले आहे." या ट्विटसोबत वासिलेंको यांनी एका या प्लांटमध्ये झालेल्या भीषण स्फोटांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये होणारे स्फोट आणि धूर दिसत आहे. रशिया जाणूनबुजून 'एक मानवी संकट' निर्माण करत असल्याचा आरोप युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रात्री एका दूरसंदेश भाषणात केला आणि आणखी रक्तपात टाळण्यासाठी आपल्याला भेटण्याचे आवाहन रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना केले.