अन्...पुतीन यांचा ब्लॅक बेल्ट काढला

    दिनांक : 01-Mar-2022
Total Views |
नवी दिल्ली : युक्रेनवर आक्रमण केल्याबद्दल रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा मानद तायक्वांदो ब्लॅक बेल्ट काढून घेण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधून देशाला निलंबित केल्यानंतर आता पुतिन यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.

Puritn 
 
जागतिक तायक्वांदो संघटनेने 'विजयापेक्षा शांतता अधिक महत्त्वाची' असल्याचं सांगत पुतिन यांच्यावर कारवाई केली आहे. आंतरराष्ट्रीय ज्युडो फेडरेशनने रविवारी पुतीन यांचा मानद अध्यक्ष आणि राजदूत म्हणून असलेला दर्जा युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्ध संघर्षामुळे निलंबित केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. FIFA आणि UEFA सारख्या इतर क्रीडा संघटनांनी रशियन राष्ट्रीय संघ आणि क्लबला स्पर्धेतून निलंबित केले आहे.
जागतिक तायक्वांदो संघटनेने, "विजयापेक्षा शांतता अधिक मौल्यवान आहे" या ब्रीदवाक्याचा हवाला देत युक्रेनमधील रशियन लष्करी कारवाईचा निषेध केला आणि म्हटले की, निरपराध जीवांवरचे क्रूर हल्ले या खेळाच्या आदर आणि सहिष्णुतेच्या मूल्यांचे उल्लंघन करतात. या संदर्भात, जागतिक तायक्वांदोने नोव्हेंबर २०१३ मध्ये व्लादिमीर पुतिन यांना प्रदान केलेला मानद ९ वा डॅन ब्लॅक बेल्ट काढून घेण्याचा निर्णय घेतला असल्याचं प्रशासकीय मंडळाने एका निवेदनात म्हटलं आहे.