भारताचे ४ मंत्री जाणार विद्यार्थ्यांच्या मदतीला... मोदींचा मोठा निर्णय

    दिनांक : 28-Feb-2022
Total Views |
नवी दिल्ली : रशिया-युक्रेनमध्ये गेल्या पाच दिवसांपासून युद्ध सुरू आहे. 4 Indian ministers युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थी तेथे अडकलेले आहेत.
 
Modi
 
या भारतीय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी भारतीय सरकारने ऑपरेशन गंगा हि मोहिमेची सुरुवात केली आहे. या मोहिमे विद्यार्थ्यांसोबत समन्वय साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रातील चार मंत्री युक्रेन लगतच्या देशात जाणार आहेत. यासंदर्भात मोदींनी आज (२८ फेब्रुवारी) एक उच्चस्तरीय बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत केंद्रातील चार मंत्री जाणार असल्याचे निश्चित झाले आहेत.
 
 कोण कोणत्या देशात जाणार? 
मिळालेल्या माहितीनुसार, 4 Indian ministers सिंधिया रोमानिया आणि मोल्दोव्हाला जाणार आहेत. किरेन रिजिजू स्लोव्हाकियाला, हरदीप सिंग पुरी हंगेरीला आणि व्हीके सिंग पोलंडला जाणार आहेत. युक्रेन आणि रशियामध्ये सुरू झालेल्या युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. सध्या रशियाला युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घ्यायची आहे, पण त्यात यश आलेले नाही. सोमवारी सकाळीही तेथे स्फोटांचे आवाज ऐकू आले.