युक्रेनची दोन गाव रशियाच्या ताब्यात video...

    दिनांक : 24-Feb-2022
Total Views |
युक्रेन : रशिया Russian आणि युक्रेनमधील वाद चर्चेच्या माध्यमातून मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच मोठी घडामोड समोर आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली आहे.

Ukraine1 
पुतिन यांनी रशिया विशेष लष्करी ऑपरेशनला सुरुवात करत असल्याचं सांगितलं असून या लष्करी कारवाईमधून युक्रेनचे असैनिकीकरण करण्याचा प्रयत्न असेल असंही ते म्हणाले आहेत.
 

halle 
हल्ल्याला प्रत्युत्तर देणार...बायडन यांचा इशारा
यावेळी त्यांनी युक्रेनच्या लष्कराला शस्त्र खाली ठेवा आणि आपल्या घऱी निघून जा असंही सांगितलं आहे. इतकंच नाही तर अमेरिकेसह इतर युरोपला मधे पडल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे. दरम्यान रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, रशियाने पूर्व युक्रेनमधील दोन गावं ताब्यात घेतली आहेत. तसेच रशियाने Kharkiv येथील अपार्टमेंट कॉम्प्लेक्सवर हल्ला केला असून यामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
 आमच्या देशावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न 
एकाच वेळी रशियाने Russian अनेक बाजूंनी युक्रेनवर आक्रमण करण्यास सुरुवात केली असून जवळजवळ २५ ठिकाणी हल्ले केले आहेत. आमच्यावर हल्ला करुन जबरदस्तीने आमच्या देशावर ताबा मिळवण्याचा हा रशियाचा आक्रमक पवित्रा आहे. आमच्या देशातील शांततापूर्ण शहरांवर रशिया सध्या सर्व बाजूंनी हल्ले करत आहे, असं युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय. ईशान्येकडून रशियन लष्कर देशामध्ये घुसखोरी करत असल्याचंही युक्रेननं म्हटलंय. देशाची राजधानी कीव आणि दुसरं सर्वात महत्वाचं शहर असणाऱ्या कारकीवमधील लष्करी तळांवर रशियाने मिसाइलने हल्ला केल्याचं युक्रेनच्या गृहमंत्रालयाने म्हटले आहे.
 

 
रशियाकडून एअरपोर्ट बंद AFP नं दिलेल्या वृत्तानुसार, पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाईचे आदेश देत, रशियाचा Russian त्यावर कब्जा करण्याचा कोणताही हेतू नसल्याचं सांगितलंय. पण जर बाहेरून धोका असेल तर त्याला तत्काळ प्रत्युत्तर दिलं जाईल. यासोबतच रशियानं युक्रेनच्या सीमेजवळ सुमारे 2 लाख सैनिक तैनात केले आहेत.
युक्रेनमध्ये अडकले 20,000 भारतीय
इकडे युक्रेनची राजधानी कीवमध्ये स्फोटाचे अनेक आवाज ऐकू येत आहेत. युक्रेनचे तिसरे मोठे शहर क्रेमटोर्स्क आणि ओडेस्सा येथे स्फोटाचा आवाज ऐकू येत आहे.
रशियाची पाच विमाने पाडली एएफपीच्या वृत्तानुसार, आता रशियन सैन्यानं (Russian forces) म्हटलं की, त्यांनी युक्रेनच्या (Ukraine) लष्करी आणि हवाई तळांना लक्ष्य करून ते नष्ट केले आहेत. दुसरीकडे युक्रेननं हार मानणार नसल्याचं म्हटलं आहे. लुहान्स्क भागात रशियाची पाच विमाने (Russian planes) आणि एक रशियन हेलिकॉप्टर (Russian helicopter) पाडण्यात आल्याचं युक्रेनच्या लष्करानं म्हटलं आहे. युक्रेनची राजधानी कीवमध्ये रशियाने क्रूझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. युक्रेनमधील ओडेसा येथील ब्लॅक सी बंदरात स्फोट झाल्याची माहिती एएफपीनं दिली आहे. गुरुवारी सकाळपासून युक्रेनच्या विविध भागातून स्फोटाचं वृत्त येत आहे. याआधी युक्रेनच्या पूर्वेकडील भाग आणि कीवमधून स्फोट झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.

युक्रेनचे रशियाला भावनिक आवाहन
 
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर जेलेन्स्की यांनी टीव्हीवर थेट येऊन रशियाला Russian लष्करी आदेश देण्यापूर्वी सीमेवर सतत वाढत असलेल्या तणावाच्या दरम्यान युद्ध टाळण्याचं उत्कट आवाहन केलं. त्यांनी रशियन लोकांना रशिया-युक्रेनच्या सामायिक इतिहासाची आणि संस्कृतीची आठवण करून दिली. जेलेन्स्की म्हणाले की, त्यांनी व्लादिमीर पुतिन यांना देखील कॉल केला होता. मात्र कोणतेही उत्तर मिळाले नाही. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, त्यांच्या देशाला शांतता हवी आहे.